रेखांकन नाही तर शक्तिपीठ महामार्गच रद्द करा, जिल्हाधिकांऱ्यांना दिले निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/01/2026 7:10 PM

     नागपुर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यातील एकोणीस गावामधुन जात आहे. बाधीत होणाऱ्या या गावातील बहुतांशी शेतकऱ्यांनी हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी भुमीका घेतली आहे. याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण या महामार्गाला समांतर महामार्ग आहे.  हे मा. मुख्यमंत्र्यांनी मान्य करुन या महामार्गाचे रेखांकन बदलत असल्याचे जाहीर केले आहे. पण रेखांकन बदल केला तरी समांतर महामार्ग राहाणारच आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गच रद्द केला पाहीजे, असे निवेदन आज मा. जिल्हाधिकारी यांना दिले.

 समांतर दुसरा महामार्ग तर आहेच पण इतरही  प्रश्न आम्ही मांडले आहेत त्याबद्दल मा. मुख्यमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. रेखांकन बदल केल्यामुळे महापुराचा धोका टळणार नाही. बागायत असलेली शेती अधिग्रहीत होणार आहे. शेताच्या मध्यातुन महामार्ग गेल्यामुळे शेतीचे दोन भाग होणार आहेत. यासारख्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांपुढे काही प्रश्न तयार होणार आहेत. त्यामुळे कसल्याही परस्थितीत हा महामार्गच रद्द झाला पाहीजे ही आमची मागणी आहे. रेखांकन बदलले तरी जिल्ह्यातील दुसऱ्या कोणत्यातरी शेतकऱ्याचा बळी यामध्ये जाणार आहे. वृत्तपत्रामधील बातम्या आणी सोशल मिडीयारील माहीतीवरुन हा महामार्ग खानापुर, कडेगाव आणी वाळवा तालुक्यातुन नेहणार असल्याचे समजते. पण याही तालुक्यातील सर्वच जमिनी बागायती आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी सुद्धा अडचणीत येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी काॅम्रेड उमेश देशमुख, महेश खराडे, प्रवीण पाटील, उमेश एडके, यशवंत हारुगडे, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील इत्यादीसह शेतकरी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या