जामखेड (प्रतिनिधी) :
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जामखेड तालुक्यातील ५१ मंजूर लाभार्थ्यांना घरगुती शौचालय अनुदानाची रक्कम येत्या ८ दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात आली आहे.
दीर्घकाळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरला असून, प्रशासनाने वेळेत दखल घेऊन निधी वितरणाची स्पष्ट वेळमर्यादा जाहीर केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या सकारात्मक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री सचिवालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. शासन जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून योग्य पाठपुराव्यानंतर तात्काळ निर्णय घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
याचप्रमाणे उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदानही लवकरात लवकर वितरित करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
— रविराज शिंदे
माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist),
जामखेड तालुका