आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. - जिल्हा रुग्णालय, सातारा अंतर्गत नर्सिंग कॉलेज येथील नव्याने सुरु झालेल्या बीएसस्सी नर्सिंग, तसेच एएनएम व जीएनएम या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना यावेळी विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती. याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, डॉ. पुरुषोत्तम मडावी उपसंचालक (शुश्रूषा) आरोग्य सेवा मुंबई, डॉ. निलिमा सोनावणे सहा. संचालक (शुश्रूषा) आरोग्य सेवा मुंबई, डॉ. विनायक काळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सातारा, डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या श्रीमती. सरला पुंड, डॉ. स्मिता लोंढे, श्रीमती. अनिता काळसेकर, तसेच नर्सिंग कॉलेजच े सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थ्यांच े पालक उपस्थित होते.
या प्रसंगी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती व समाजातील महत्त्व आधोरेखित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती व समाजातील महत्त्व आधोरेखित करुन विद्यार्थ्यांना मोलाच े मार्गदर्शन केले. डॉ. पुरुषोत्तम मडावी उपसंचालक (शुश्रुपा) आरोग्य सेवा मुंबई यांनी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. निलीमा सोनावण े सहा. संचालक (शुश्रुपा) आरोग्य सेवा मुंबई यांनी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक व रोजगाराची संधी याबाबत अतिशय महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, यांनी परिचारीका या रुग्णालयाच्या आधारस्तंभ असल्याचे व भावी परिचारीकांना रुग्णसेवेचे मार्गदर्शन केले, डॉ. विनायक काळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सातारा यांनी देखील विद्यार्थी परिचारीकांना नैतिकता व रुग्णांशी आत्मियतेने वागण्याबाबत मार्गदर्शन केले.