*श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था अंतर्गत सर्व शाळांचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन "संस्कार-2026 चे थाटात उद्घाटन* *वणी* -- येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत वणी पब्लिक स्कूल व जूनियर कॉलेज, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय व छत्रपती शाहू महाराज आयटीआय या शाळांचे आज दि.9 जाने.रोजी दोन दिवसीय संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन "संस्कार-2026" चे वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.संजयभाऊ देरकर यांचे हस्ते थाटात उद्घाटन झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाचे माजी कुलगुरू व क्षेत्राचे भुषण,भुमीपुत्र मा.डाॅ.भालचंद्र चोपणे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेचे सचिव मा.ओमप्रकाशजी चचडा सर उपस्थित होते तर अतिथी म्हणुन संस्थेचे सदस्य मा.विक्रांत चचडा सर,वणी पब्लीक स्कुलचे प्राचार्य मा. राकेशकुमार देशपांडे,राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.अभय पारखी,शाहु महाराज आय.टि.आय.चे प्राचार्य मा. सिद्धांत तेलतुंबडे यांची उपस्थिती होती. तीनही शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी काव्य पारखी, कु.शिवानी वर्मा आणि तेजस खैरे हे मंचावर उपस्थित होते. वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेशकुमार देशपांडे, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे प्राचार्य अभय पारखी व छत्रपती शाहू महाराज इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य सिद्धांत तेलतुंबडे यांनी आपापल्या विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.संस्थेचे सचिव श्री.ओमप्रकाश चाचडा सर यांनी याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेची वाटचाल व उज्वल भविष्याबद्दल माहिती दिली.आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती करून देशाचे चांगले नागरिक बनावे अशा अपेक्षा करून संस्थेला शुभेच्छा दिल्या व मा.भालचंद्र चोपणे साहेबांनी शिक्षण घेतांना अभ्यासक्रम कसा पुर्ण करावा व ध्येय गाठावे याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी दरवर्षी संस्थेद्वारा दिला जाणारा स्वर्गीय हंसराज चचडा आर्यभट्ट पुरस्कार सिद्धांत डगावकर याला तसेच स्वर्गीय कल्पना चावला स्मृति पुरस्कार कु.खुशी बोढाले हिला तसेच गुणवत्ता पुरस्कार कु.हिमानी चचडा व सत्यम मिश्रा तसेच स्वर्गीय नंदकिशोर हंसराजजी चचडा स्मृती पुरस्कार अमर गुरुकर याला व स्वर्गीय नंदकिशोर हंसराजजी स्मृति पुरस्कार ऋषिकेश शिवरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.प्रणोती खडसे व कु.शर्वरी बाविस्कर यांनी संयुक्तरीत्या केले व आभार प्रदर्शन सिद्धांत तेलतुंबडे यांनी केले.यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले