अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. निर्मला भामोदे यांची निवड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/01/2026 9:14 PM

नांदेड  : येत्या रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे गुरु रविदास, वीर कक्कय्या आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून अकोला येथील प्राचार्या डॉ. सौ. निर्मला पुंडलिकराव भामोदे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
          आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन संयोजन समितीचे प्रमुख इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी ही घोषणा केली असून पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचा मान सुप्रसिद्ध साहित्यिक व गुरु रविदास यांच्यावर प्रबंध लिहिलेल्या प्रा. डॉ. निर्मला भामोदे यांनी मिळविला आहे, याबद्दल महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
          कवी, लेखक, अभ्यासक, प्रबोधनकार, वक्ता, नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रा. डॉ. निर्मला भामोदे यांनी गुरु रविदास यांच्या जीवनकार्यावर पीएचडीसाठी प्रबंध लिहून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. गुरु रविदास, म. जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, संत चोखोबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ईत्यादि महामानवांवर त्यांनी साहित्य लेखन केले आहे.
       प्रा. सौ. निर्मला भामोदे यांना महाराष्ट्र शासनाचे संत रविदास पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, नवी दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीचे सावित्रीबाई फुले पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप मिळाली आहे. अमरावती येथे संपन्न झालेल्या पाचव्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
          नांदेड येथे आयोजित आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रा. डॉ. सौ. निर्मला भामोदे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. देशभरातील मान्यवर साहित्यिक, लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते या साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत असे मुख्य संयोजक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (मो. ९४२३७८१११४) यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या