कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचा खेळाडू शनिराज हारगे याची तेलंगना येथे होणा-या सिनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली.
दि.11 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत तेलंगना येथे सिनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाकडून शनिराज हारगे खेळणार आहे.या पूर्वी शनिराज हारगे हा जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब जालंधर,ओडिसा येथे झालेल्या 4 सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला आहे. हि त्याची पाचवी सिनियर राष्ट्रीय स्पर्धा आहे.
शनिराज हारगे यास राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे,प्रा.सचिन चव्हाण, संजय हिरेकुर्ब, विशाल बन्ने, शितल कर्नाळे, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,महेश कर्नाळे,अतुल पाटील, शेखर स्वामी, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, वासुदेव जमदाडे,दिपक पाडळे,स्वप्नील पाटील आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.