राजूर येथे क्रां.सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

  • Mr.Irfan Shaikh (Wani Rajur)
  • Upadted: 09/01/2026 4:03 PM

राजूर कॉलरी येथे क्रां.सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

वणी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन राजूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वहारा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
    स्वच्छता अभियान व वेशभूषा स्पर्धेसह अभिवादन रॅली,  गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी येथील रविदादा मानव यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, मी सावित्री हा प्रभावी एकपात्री प्रयोग, वाबळे महाराजांचे कीर्तन, संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांचा कार्यक्रम पार पडला.
  या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या