.साध्या पध्दतीने अॅड. काझी यांनी भाजपकडून दाखल केला उमेद्वारी अर्ज
मिरज शहराच्या विकासासाठी गेल्या २५ वर्षापासून मिरज सुधार समितीच्या माध्यमातून सातत्याने लढा देणारे मिरज सुधार समितीचे संस्थापक अॅड. अल्लाबक्ष काझी यांनी कोणत्याही लवाजमा न गोळा करता अत्यंत साध्या पध्दतीने प्रभाग क्र. ६ मधून सर्वसाधारण गटात उमेद्वारी अर्ज गेला आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू व निर्भिड व्यक्तीमत्व असलेल्या अॅड. अल्लाबक्ष काझी यांना भाजपाने मुस्लिम बहुल प्रभाग असलेल्या क्र. ६ मधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अॅड. अल्लाबक्ष काझी यांनी मिरज सुधार समितीचे प्रमुख सहकाऱ्यासमवेत हजरत मिरासाहेब दर्गाला गलेफ अर्पण करुन उमेद्वारी अर्ज दाखल केला. उमेद्वारी अर्ज भरल्यानंतर अॅड. काझी म्हणाले, प्रभाग क्र. ६ हा प्रभाग भय व नशामुक्त करण्यासाठी तसेच, हजरत मिरासाहेब दग्र्याच्या विकासासाठी आपली उमेद्वारी आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, अभिजीत दाणेकर, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, झीशान मुश्रीफ, अमीर डांगे, शब्बीर बेंगलोरे, संदीप हंकारे, रामलिंग गुगरी, सलीम खतीब यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.