निवडणूक पार्श्वभुमीवर महापालिकेत सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/12/2025 7:41 PM

नांदेड :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असुन दि.१५.०१.२०२६ रोजी मतदान होणार आहे. सध्या निवडणूक ही नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा अंतिम टप्यावर येऊन ठेपेलेली असतांना काही दिवसांत प्रचारास सुरुवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दि.३०.१२.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या अध्यक्षतेखाली *"सनियंत्रण समितीची"* बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिक्षक कार्यालय, आयकर विभाग, विक्रकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी निवडणूक विभागाचे उपआयुक्त नितीन गाढवे यांनी निवडणूकीचे टप्पे अर्थात प्रभाग रचना, आरक्षण निश्चीती, मतदार यादी, मतदार केंद्र निश्चिती, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती व निवडणूक कार्यक्रम यासंदर्भात माहिती विशद केली. सनियंत्रण समितीच्या माध्यमातुन आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादींवर प्रशासनाची करडी नरज असणार आहे.

त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे-प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह संवेदनशील भागांसाठी विशेष व्यवस्था, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याकरिता देण्यात येणाऱ्या वस्तु, मद्य, पैसा इत्यादींच्या वाटपावर अंकुश ठेवणे, रोख रक्कमांच्या ने-आणी संदर्भात लक्ष ठेवणे त्यासाठी महत्वाच्या ठिकाणी उदा. विमानतळ, रेल्वेस्टेशन, हॉटेल्स, फार्महऊस यांच्यावर नजर ठेवणे, बँकामार्फत, पतसंस्थेमार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पेड न्यूज, सोशल कमेंट, सोशल मिडीया व इंटरनेट इत्यांदीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, उपायुक्त नितीन गाढवे, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड, विक्रकर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत गांगुर्डे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस.एल. कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभजी धोत्रे, प्रादेशिक परिवहन विभागाचे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कणकरेज व महावितरणचे कार्यालय अधिक्षक विजय घनबहादुर यांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या