सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्या आणि घडामोडींवर आवाज उठवणारी संघटना म्हणून नावारूपास आलेल्या लोकहित मंच या संघटनेच्या वतीने दरवर्षी, तरुण पिढी सुधारावी, तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून, 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून, "दारू नको दूध प्या" हा अनोखा उपक्रम गेल्या 21 वर्षांपासून राबवण्यात येतोय.
या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष असून, याही वर्षी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये सायंकाळी सहा वाजता हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली आणि परिसरातील समस्त नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे.