इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहिर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/12/2025 3:58 PM

नांदेड : अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहिर झाला असून रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
          भारतीय संविधान सन्मान समारोह समिती, मौलिक अधिकार संघर्ष समिती आणि ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुमठाणा, भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भारतीय संविधान सन्मान समारोह आयोजित करण्यात आला आहे.
यात भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत.
        देशात विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून भारतीय संविधान व परिवर्तनवादी विचारांचा सातत्याने प्रचार प्रसार करणारे परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची या राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे आयोजक तथा राष्ट्रीय कवी मधू बावलकर (आदिलाबाद) यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या