नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे इसमांवर मास रेडचे आयोजन करून 1,71,350/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/12/2025 8:41 PM

नांदेड :- नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबंधाने ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे इसमां विरूध्द कारवाई करण्यासाठी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिनांक 28.12.2025 रोजी मास रेडचे आयोजन केले होते.

सदर मास रेड कामी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भाग घेतला होता.

सदर मास रेड दरम्यान अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे लोकांचे ठिकाणावर छापा टाकून समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहीमेमध्ये नांदेड जिल्हयात एकुण 49 गुन्हे दाखल करून एकुण 49 आरोपीतांवर कारवाई करून एकुण 1,71,350/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या