भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा पूर्वसाठी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रविण दत्तात्रय इखनकर यांची जळगाव जिल्हा चिटणीस नियुक्ती घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी नुकतीच जाहीर केली.
प्रसंगी प्रविण इखनकर यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, राजुमामा भोळे, अमोल जावळे. खासदार स्मिताताई वाघ, मंगेशदादा चव्हाण, डॉ राजेंद्र फडके, अजयभाऊ भोळे, प्रमोद सावकारे, यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी प्रविण इखनकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे .
मला दिलेल्या संधीचे योग्य प्रकारे पक्षाचे कार्य करेल असे प्रविण ईखनकर यांनी सांगितले आहे .