सांगली – आषाढी एकादशी निमित्त इन्साफ फौंडेशन व सावली बेघर निवारा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एक आगळीवेगळी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात बेघर नागरिकांच्या हस्ते वारकरी व गरजू नागरिकांना केळी वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश केवळ अन्नवाटप नव्हता, तर समाजात बेघर लोकांबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, तसेच त्यांच्या आत्मसन्मानाला चालना देणे हा होता. इन्साफ फौंडेशनचे कार्यकर्ते, सावली निवारा केंद्राचे कर्मचारी आणि वारकरी मंडळी यांच्यात समन्वय साधून हा उपक्रम पार पडला.
वारीचा उत्सव हा भक्ती, समर्पण आणि सेवाभाव यांचा संगम असतो. या पवित्र दिवशी गरजू आणि उपेक्षित घटकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देणे, ही खरोखरच स्तुत्य गोष्ट ठरली. या उपक्रमातून “समाजातील प्रत्येक घटक हा एकमेकांचा आधार आहे” हे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील काळात असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.— इन्साफ फौंडेशन व सावली निवारा केंद्र
सामाजिक एकतेसाठी समर्पित.यावेळी रफिक मुजावर, वदंना काळेल, फरहान शेख व लाभार्थी हजर होते.