आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी दि :या सरकारच्या काळात देशांमध्ये महिला असुरक्षित आहेत. ६७३८८ महिलांवर अत्याचार झाले. तेव्हा का लाडकी बहीण आठवली नाही. काही ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुद्धा टाळाटाळ केली. अशा सरकारला आता लाडकी बहीणच हद्दपार करेल असे वक्तव्य खा. शरदचंद्र पवार यांनी दहिवडी येथे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारावेळी आयोजित केलेल्या सभेत केले.
यावेळी उपस्थित खा. धैर्यशील मोहिते पाटील,विजयसिंह मोहिते पाटील,अभयसिंह जगताप, प्रभाकर देशमुख,अनिल देसाई,उत्तम जानकर,सुरेंद्र गुदगे,मनोज पोळ,अनिल पवार,रणजित देशमुख,पिंटू मांडवे,किशोर सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले या तालुक्याचे नेतृत्व स्वर्गीय सदाशिवराव पोळ व स्व.भाऊसाहेब गुदगे यांनी चांगल्या पद्धतीने केले होते. तुम्ही एकदिलाने सर्व जण काम करीत आहे. त्यामुळे विजय सोपा झाला आहे.राज्य केंद्र सरकारचे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. लोकसभेला चारशेचा पार नारा देणारे यांच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढा दिला आणि राज्यात चांगले यश मिळाले.देशाची घटना जतन करण्याचे काम आम्ही एकत्रित येऊन केले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार पाठवणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणीचे हित करत असतील तर चांगली गोष्ट आहे पण महिलांवर अत्याचाराचे ६७३८८ महिलांवर अन्याय झाले एक बाजूला लाडकी बहिण म्हणायचे एकीकडे अत्याचाराच्या घटनांत वाढ करायची हि दुटप्पी भूमिका महायुती सरकारची आहे. शेतकरी आत्महत्या गंभीर बाब आहे. कर्जामुळे अनेकांच्या आत्महत्या होतायत. माण खटाव मध्ये शैक्षणिक संस्था, औद्योगिक विकास होण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या पाठिशी राह असे प्रतिपादन त्यांनी केले.
खा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले या सरकारने लाडकी बहीण सांभाळली पण दाजीच्या खिशाला कात्री लावली आहे. अनेक कोट्यावधीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. परंतु आम्ही २५ लाखापर्यंत आरोग्य विमा देणार, तीन लाखापर्यत कर्ज माफी करणार. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार.माण खटावचा सिंचन प्रश्न मार्गी लावू. या तालुक्यात mpsc स्टडी सेंटर उभा करून विध्यार्थीना वाव देणार.येथील लोकप्रतिनिधीची पवार साहेबांवर बोलायची लायकी नाही. मोठया माणसांवर बोलल्यानन्तर मोठे होता येत नाही.नीट वागा इथून पुढे गाठ माझ्याशी आहे असे आवाहन त्यांनी दिले.
मविआचे उमेदवार प्रभाकर घार्गे म्हणाले की मागील निवडणुकीत आम्ही कमी पडलो. मात्र आता ही निवडणुक जिंकणार त्यामुळे गोरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे वैयक्तिक टीका करतायेत. परंतु मी काय आहे हे तालुक्याला माहिती आहे.आणि गोरे काय आहेत हे पण तालुक्याला माहिती आहे.या तालुक्यात मोठे रुग्णालय, कॉलेज झाले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना दबावात ठेवले, पोलिसांना त्रास दिला आहे. म्हणून हा अन्याय थांबायचा असेल तर एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन मला आमदार करा तुमची सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाकर देशमुख म्हणाले की या सरकारच्या काळात, शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय. पवार साहेबांच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. या तालुक्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात सुरू परंतु येथील गुंड प्रवृत्ती हद्दपार केल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही कारण मी पवार साहेबांचा चेला आहे. त्यांच्या तालमीत तयार झालोय.माझी बरोबरी करायची गोरेंची लायकी नाही. प्रतिज्ञा पत्रात गोरेंवर अनेक गुन्हे आहेत. अशा गुंडाला आता हद्दपार कारण आणि प्रभाकर घार्गे यांना आमदार बनवणारच असे प्रतिपादन त्यांनी केले.
अभयसिंह जगताप म्हणाले या मतदार संघात हणतो मारतो आणि बघून घेतो अशा प्रकारची भाषणे आ. गोरे करत आहेत.सिद्धनाथ पतसंस्थामध्ये अरुण गोरेंना चेअरमन करून धनगर समाजातील अर्जुन काळे, मामुशेठ विरकर यांच्यावर अन्याय केला आहे.आणि सिद्धनाथ पतसंस्थामध्ये स्वीकृत संचालक सोनिया गोरे यांना घेतले, माळी समाज सोडून दुसरे कोणी नाही का?बाकीच्या माळी समाजाला का पदे नाहीत? बाकीच्या माळी समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यांचे करिअर आ. गोरेंमुळे खराब झाले आहे. त्यामुळे अशा माणसाला पुन्हा आमदार केले तर युवकांना वाईट दिवस येतील असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनिल देसाई म्हणाले जाती जाती मध्ये भांडणे आ.गोरेनी लावली. डुकराप्रमाणे गोरेंची सवय गेली नाही. गुंडगिरी, गुन्हेगारी, लबाडी यांची सांगलीपासून लागलेली अजून गेलेली नाही. अशा माणसाला तालुक्यातून हद्दपार करूया असे प्रतिपादन त्यांनी केले.
दहिवडी : मविआचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ बोलताना खा. शरदचंद्र पवार