राजूर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य अभिवादन मिरवणूक

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 16/11/2024 10:54 PM


भारतीय स्वतंत्र लढ्यात आदिवासींचे हक्क अधिकार मिळवून देण्याकरिता इंग्रज व पुंजिपती धर्मांध व्यवस्थेविरुद्ध जल जंगल जमिनीबाबत उलगुलान पेटविणाऱ्या व आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जागृत करून त्यांच्यात सांस्कृतिक व सामाजिक स्वातंत्र्याची ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीसुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोज शुक्रवार ला राजूर येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणूक काढून त्यांच्या उलगुलानास अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीची सुरुवात वीरांगना राणी दुर्गावती मडावी नगर राजूर इजारा येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात येऊन मिरवणूक बौद्ध विहार राजूर नंतर बिरसा भूमी येथे येऊन सप्तरंगी झेंडा वंदन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. त्यांनतर मिरवणूक बिरसा मुंडा नगर व राजूर गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येऊन दीक्षाभूमी राजूर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या रॅलीत आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. विशेषतः आदिवासी जनजागृती विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली व सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय काम केले. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने राजूर येथील आदिवासी समाजाबरोबर गावातील लोकांची उपस्थिती होती. या अभिवादन मिरवणुकी करीता ॲड अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, मारोती कन्नाके, संदिप सिडाम, स्वप्नील किल्लेकर, राजू पंधरे, अरुण येलादे, शांताराम कीनाके
आदिवासी जनजागृती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रोहित किनाके व पदाधिकारी कृष्णा मेश्राम, रमेश येडसकर, उज्वल कुमरे, रुपेश नैताम, सुदर्शन कुमरे, रजत आत्राम, शिरेष कुमरे, आदित्य येलादे, किसन किणाके, विजय उईके, लकी सुरपाम, सागर किनाके, जगण सुरपम, विजय गडे, चेतन केरम, गणेश कोवे, हरिदास कोडापे, अजय कदम, राजेश उईक, सहील किनाके, पियूष घोडाम, सहिल मेश्राम, सूरज पेंदाम, किसन किनाके, सानिका नैताम, श्रावणी मेश्राम, स्वेता टेकाम, गायत्री कनाके, धनश्री पंधरे, अंकीता उईके, अंजली ऊईके, निशा कुमरे, खुशी येलादे, तनु टेकाम व आदिवासी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले

Share

Other News

ताज्या बातम्या