फ्लॉप सभेने केले पाझारेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!!
चंद्रपूर:-
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित सभा फ्लॉप शो ठरली.ही सभा फ्लॉप होताच अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांना बूस्टर डोज मिळाला असून त्यांनी केलेला उठाव योग्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात उमटली आहे.
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपने किशोर जोरगेवारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेली 30 वर्षे भाजपात जिवाचे रान करणारे ब्रिजभूषण पाझारे यांनी अन्यायाला वाचा फोडली आणि अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णय मतदारांना पटू लागला असुन संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांना प्रचंड जनाधार मिळत आहे.
विशेष म्हणजे, घुघुस हा औद्योगिक परिसर असून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी तेथील कार्यकर्त्यांना विधानसभा लढण्याची संधी दिली नाही. ब्रिजभूषण पाझारेंच्या रुपाने पहिल्यांदा सक्षम उमेदवार घुगूस परिसरात मिळाल्याने औद्योगिक नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पाझारे यांच्यासाठी ही संजीवनी ठरणार आहे.
चंद्रपूर शहरात भाजपचा मतदार संभ्रमात असून कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. जोरगेवारांच्या खेम्यातून भाजप कार्यकर्त्यांना मान मिळत नसल्याने नाराज कार्यकर्ते आता पाझारेंच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज चंद्रपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली. मात्र सभेला प्रतिसाद मिळाला नाही. शहा अवघे पाच मिनिटं बोलून निघून गेले. त्यामुळे जोरगेवारांच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे. संपूर्ण मतदारसंघात हा संदेश वाऱ्यासारखा पसरत चालला आहे.या सभेने जोरगेवार बॅक फुटवर गेले आहेत. पाझारे यांना याचा फायदा होऊ शकतो.
कोणतीही उम्मीदवार मतदारसंघात अजूनही प्रभाव पाडू शकलेले नाही, त्यामुळे मतदार असलेले मुस्लिम आणि बौद्ध बांधवही पाझारे यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तूर्तास तरी ब्रिजभूषण पाझारे यांना मतदारसंघात पहिली पसंती मिळू लागली आहे.