पिंपळगाव बसवंत येथेभारत यात्रा च्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा स्तरावर होत असलेल्या गौ ध्वज स्थापना
शंकराचार्य जींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये गौ ध्वज स्थापन करणारे प्रतिनिधी ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती '१००८' यांच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गौ प्रतिष्ठा ध्वजाची स्थापना करण्यात आली.
जगद्गुरु शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गौ ध्वज स्थापन करण्यात आला. या क्रमात आज आपल्या शहर पिपळंगांव (बसवंत) नाशिक मध्ये देखील गौ ध्वज स्थापना करण्यात आली. गौ ध्वज स्थापनाच्या कार्यक्रमात परमाराध्य परमधर्माधीष उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या निर्देशानुसार आलेल्या प्रभारी गो-सासंद बिलासपुर व धर्मासद राजनंदगावं सूश्री उमा सिंह ठाकुर कवर्धा छतिसगढ़ यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, पूज्य शंकराचार्य महाराजांनी गोमाता ला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी २२ सप्टेंबर २०२४ रोजी अयोध्या धाम येथे रामकोटाची परिक्रमा करून या यात्रेची सुरुवात केली होती. ही ऐतिहासिक यात्रा पूर्वोत्तर प्रदेशातील बहुतेक राज्यांना भेट देत चारही दिशांतून भारताच्या सर्व ३६ राज्यांच्या राजधानीत गो प्रतिष्ठा ध्वजाची स्थापना करून यशस्वीरीत्या पार पडली आहे.
या ऐतिहासिक यात्रेला काही दिवसांपूर्वी एक मोठे यश मिळाले जेव्हा पूज्यपाद शंकराचार्य महाराजांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी देशी (रामा) गायीला राज्यमाता घोषित केले आणि कॅबिनेटच्या ठरावाची प्रत शंकराचार्य यांच्या चरणी अर्पण केली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी जगद्गुरु शंकराचार्यांना आमंत्रित करून पादुका पूजन करीत गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. पूज्य शंकराचार्य महाराज आपल्या ऐतिहासिक यात्रेच्या माध्यमातून भारत भूमीवरून संपूर्णतः गौहत्या नष्ट करून गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याचा संकल्प सिद्धीस नेऊ इच्छितात.
गो-सासंद सूश्री उमा सिंह यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना सांगितले की, गायीला फक्त दूध देणारी यंत्र मानणारे आणि गायीला मांस मानणारे दोन्ही प्रकारचे लोक गायीचे महत्त्व जाणत नाहीत.
आपल्या संस्कृतीत गायीला एवढा मान आहे की आपण आपल्या ३३ कोटी देवतांच्या रूपातील गोमातेसाठी पहिली रोटी अर्पण करतो.
आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी वैद्य नवनाथ दुधाळ श्री संतोष नागनाथ शिंदे गो-सासंद नाशिक व महिला गो-विधायाक सौ. रूपाली शिंदे श्री बाळांसाहेब आबेकंर गो-सासंद नाशिक व सतिश शिंदे गो-विधायाक चादंवड प्रमोद गटकल (संस्कार धनु गोशाळा येवला) उज्वल गोरक्षण संस्था पिपळंगांव बसवंत)व पंकज जैन संजय सोनवने. नाशिक गणेश गोडे, श्री किशोरकुमार ठक्कर श्री महावीर भंडारी श्री अलपेश पारख श्री बापूसाहेब पाटिल गणेश देवरे वृषाली कदम सुनिता थेटेव समस्त गोशाळा कमृचारी यांच्या नेतृत्वाखाली यांच्यासहअनेक गौ भक्त उपस्थित होते.
आपला नम्र, संतोष नागनाथ शिंदे(गो-विधायक निफाड तालुका) बाळासाहेब आबेकंर(गो-सासंद)।