कुपवाड येथील देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयाच्या दोन खेळाडुंची राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डेरवण जि.रत्नागिरी येथे राज्य स्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा व १४ वर्षाखालील राज्य स्तरीय शालेय खो-खो स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत १२ वी कला मधील कु.प्रणाली नामदेव मंडले हिने मैदानी स्पर्धेत १५०० मी.धावणे द्वितीय क्रमांक,३००० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक व क्रॉस कंट्री मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केले.१५०० मी.धावणे व क्रॉस कंट्री या दोन क्रिडा प्रकारा प्रकारामध्ये रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच डेरवण येथे झालेल्या १४ वर्षा खालील राज्य स्तरीय शालेय खो-खो स्पर्धेच्या निवड चाचणी मधुन इयत्ता ८ वी सार्थक संजय हिरेकुर्ब याची राष्ट्रीय शालेय खो-खो क्रिडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघामध्ये निवड झाली आहे.या खेळाडुंचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
दोन्ही खेळाडुंना यशवंत शिक्षण संस्थेचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक सौ.एस.पी.चव्हाण व क्रिडा शिक्षक श्री.ए.बी.कर्नाळे यांचे मार्गदर्शन लाभले.