नासाका देणार ऊसास इतरांच्या तुलनेत भाव
माजी. खासदार हेमंत गोडसे यांचे प्रतिपादन
प्रतिनीधी l देवळाली कॅम्प: नाशिक सहकारी साखर कारखाना पळसे, संचलित मे.अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल ॲण्ड एनर्जी लि, नाशिक.या कारखान्याचा सन 2024-25 गळीत हंगामाचे गव्हाण पूजन व मोळी टाकणे कार्यक्रम विधीवत संपन्न झाले यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी कारखाना ऊस उत्पादकांना इतर कारखान्यांच्या तुलनेत भाव देणार असून मागिल हंगामात एक रकमी 2600 रुपये दिलेले असून दुसरे पेमेंट रूपये 100/- प्रमाणे देणार असल्याचे घोषित केले.
नाशिक सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 या गळीत हंगामाचे गव्हान पूजन व मोळी टाकणे कार्यक्रम साध्या पध्दतीने ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी ऊस उत्पादक, निशांत वाघ, शरद कातकाडे, उल्हास जाधव, केशव तुपे, कैलास टिळे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले तर माजी खासदार हेमंत गोडसे, संचालक बी.टी.कडलग, शेरझाद पटेल, सागर गोडसे, अजिंक्य गोडसे, यांचे हस्ते काटा पूजन करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचे हस्ते गव्हानीत मोळी टाकण्यात आली. यावेळी बोलतांना माजी खासदार हेमंत गोडसे यांनी 10 वर्षे बंद असलेला नाशिक कारखाना सुरू करतांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले त्यातूनही गेल्या दोन हंगामात आलेले अनुभव झालेला तोटा याचा विचार करून चालु हंगामात पुन्हा नव्याने कारखाना सुरू करण्याचे धाडस शेतकरी, ऊस उत्पादकांच्या व कामगारांच्या भरोशावर केले आहे. आगामी काळात कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेपेक्ष जास्त ऊस निर्माण करण्याचा संकल्प केला असून याकामी ऊस उत्पादकांना सुधारीत बेणे, व खते, देण्याचा मानस असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांना कोणतीही वजावट न करता 15 दिवसाच्या आत ऊसाचे पेमेंट करणार असल्याचे सांगून ऊस उत्पादकांनी आपला कारखाना कायम सुरू राहावा यासाठी ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर, कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे माजी उपाध्याक्ष बाबुराव मोजाड, कैलास टिळे, यांनी मनोगत व्यक्त करतांना कारखान्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे, आभार जनरल मॅनेजर जे.सी.कुरणे यांनी मानले. कार्यक्रमास विलास आडके, रमेश गायकर, नवनाथ गायधनी, ज्ञानेश्वर शिंदे, सुनिल मोरे, अशोक आडके, गणपत गायधनी, जनार्दन जेजुरकर, माधवराव गायधनी, खंडु गायधनी, देविदास गायधनी दिलीप गायधनी, आदीसह. शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोड कामगार उपस्थितीत होते.