बेंगलोर रँडीयर्स तर्फे आयोजित सहाशे किलोमीटर आर क्यू १०००० क्वालिफायर सायकल राईड चिकमंगलूर येथील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आयोजित शारीरिक कस लावणाऱ्या अशा सायकल राईट स्पर्धेमध्ये भगूरची सुपुत्र गणेश कुवर यांनी आपला सहभाग नोंदवून ही राईड दिलेल्या वेळेमध्ये 38 तासांमध्ये पूर्ण करून परत एकदा भगूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी कर्नाटक मधील सर्वात उंच शिखर असे समजले जाणारे बाबा बुडनगिरी तसेच दोन वाइल्डलाइफ सेंचुरी मधून प्रवास करत अगुंबे घाट, आलदूर घाट आणि चार माडी घाट सर करत वळणावळणाच्या व चढउताराच्या अशा अतिशय खडतर मार्गातून प्रवास करत ही राईड पूर्ण केली. हि सायकल राईड पूर्ण करताना त्यांना खराब रोडचा ही सामना करावा लागला. ही राईड पूर्ण करून त्यांनी फ्रान्समधील अतिशय मानाचा असा समजला जाणारा RQ10000 अवॉर्ड प्राप्त केला. असा अवार्ड प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सायकल रायडर आहे. अशा यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे.