सांगली येथे जात पडताळणी समितीच्या उपायुक्तपदी नागेश चौगुले यांची पदोन्नतीने बदली

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 10:46 PM

सोलापूर दि, ११,
   येथील सामाजिक न्याय विभागातील  समाज कल्याण सहाय्य आयुक्त नागेश चौगुले यांची सांगली येथे जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे उपायुक्त तथा सदस्य सचिवपदी पदोन्नतीने बदली झाली आहे.
  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकतेच  सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट अ संवर्गातील अधिका-यांना उपायुक्त , समाज कल्याण व तत्सम गट अ संवर्गात पदोन्नती दिली आहे.शासनाच्या या आदेशान्वये सोलापूर समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त नागेश चौगुले यांची सांगली येथे जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे उपायुक्त तथा सदस्य सचिवपदी पदोन्नतीने बदली केली आहे.बदली झाल्याने त्यांनी सांगली येथे आपला पदभार स्वीकारला आहे.
  उपायुक्त नागेश चौगुले हे सोलापूर जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षा देऊन महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रथम  परिषदेमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून आपल्या कार्यकिर्दीला सुरूवात केली. जिल्हा समाज कल्याण अधिकारीपदी असताना त्यांनी जिल्हा परिषदेमधील शासनाच्या विविध योजना समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे
    तसेच सोलापूर व धाराशिव येथे  सहाय्यक आयुक्तपदी कार्य केले आहे.यावेळीही त्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रम शाळा वस्तीगृह यांच्याकडे विशेष लक्ष देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष दिले आहे.संस्थाचालक आणि प्रशासन यामध्ये महत्त्वाचा दुवा साधून त्यांनी शैक्षणिक विकास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. शिवाय जात पडताळणी कार्यालयामध्ये कार्यरत असताना सर्वाधिक जात पडताळणीचे प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे.धाराशिव येथे कार्यरत असताना त्यांना शासनाच्या वतीने उत्कृष्ट कोविड १९ योद्धा हे गौरव पुरस्कार व  दैनिक सकाळच्या वतीने सोलापूर आयकॉन तसेच विविध संस्थांनीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या