महापालिका क्षेत्रांतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा मनपा आवारात कुत्री सोडणार : मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 5:34 PM

सांगली प्रतिनिधी -- महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या हजारो मोकाट कुत्र्यांचा  बिनधास्तपणे वावर वाढला असून ही मोकाट कुत्री अनेक वेळा नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक बनत आहेत .कालच संजय नगर मधील एका चिमूरड्या मुलीवर अशाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .याआधी अशाच प्रकारे मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे अनेक प्रकार महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडले असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे .याआधीही आम्ही लोकहित मंचच्या वतीने अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे अशी मागणी केली असतानाही त्यावर ठोस उपाययोजना केल्याचे दिसून आलेले नाही.
          महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाहिले असता आज प्रत्येक रस्त्यावर 15 ते 20 कुत्र्यांचे कळप पहायला मिळत आहेत .त्या त्या भागामध्ये असणारी चिकन दुकाने, चिकन 65 चे गाडे यासह चिकन दुकानांचा जैविक कचरा उघड्यावर टाकला गेल्याने या ठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत आहे .त्यामुळे अशा चिकन दुकानदारांवरही निर्बंध घालून अशा दुकानदारांवर कडक  कायदेशीर कारवाई करण्यात यावी .त्याचबरोबर महानगरपालिकेची डॉग व्हॅन सर्वत्र फिरवून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे .महानगरपालिका क्षेत्र आणि त्यामधील कुत्र्यांची वाढलेली संख्या पाहता डॉग व्हॅनची संख्या सुद्धा वाढवावी,महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध करून द्यावी .अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करण्यात आली आहे .
         येत्या काही दिवसांमध्ये यावर ठोस उपाययोजना आखावी अन्यथा सदर मोकाट कुत्री महानगरपालिका आवारामध्ये सोडू असा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या