अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) : येथील बाजारचौसाळा ते निमखेड बाजार रस्ता करण्याबाबत नंदकिशोर वासुदेवराव खडसे हे आमरण उपोषणास बसले आहेत ही माहिती मिळताच मा. खासदार श्री. बळवंतभाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांनी उपोषण स्थळी भेट दिली. उपोषण करते नंदकिशोर खडसे यांच्यासोबत रस्ताच्या व पुलाच्या कामाबाबत चर्चा केली यावेळी सविस्तर चर्चेअंती शासन स्तरावर पाठपुरावा करून तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे यावेळी चर्चेत मान्य करून उपोषणकर्त्यांचे मा. खासदार श्री. बळवंतभाऊ वानखडे यांनी उपोषण सोडविले. याप्रसंगी निमखेड बाजार येथील शाळकरी विद्यार्थिनी सोबत संवाद देखील केला. यावेळी प्रामुख्याने - मा.श्री प्रमोदभाऊ दाळू (अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी ) , श्री.विलासभाऊ पवार ( माजी सभापती जि.प. अमरावती ) , डॉ. श्री गजानन टेकाळे , मा.शेख शखिल, श्री. निलेशभाऊ घोडेराव , श्री. विबीन अनोकार , श्री.नानाभाऊ पवार
( माजी सरपंच ) , सौ. सुनंदाबाई पाखरे ( सरपंच चौसाळा ) , श्री. संजयभाऊ काळमेघ
( संचालक कृ.उ.बा.स. अंजनगाव सुर्जी ) , डॉ. श्री.रोंदळे यांच्या सह निमखेड बाजार चौसाळा येथील स्थानिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.