कुपवाड औध्योगिक वसाहतीमधील प्रस्तावित सेवा दवाखान्याच्या ( ओ. पी. डी. ) जागेची पुणे राज्य कामगार विमा योजनेच्या अधिकार्‍यांकडून पहाणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 4:49 PM

*

कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं. पी - ६३, या जागेवर कृष्णा व्हॅली चेंबरने सेवा दवाखाना व्हावा यासाठी गेली ३ वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याच्या विचार करून पुणे विभागातील राज्य कामगार विमा योजनेचे  उपसंचालक राजेश सिंग व संजय शर्मा आले होते.

पूर्वी हा सेवा दवाखाना कुपवाड शहरामध्ये चालू होता काही कारणास्तव तो सेवा दवाखाना मिरज येथे स्थलांतरीत करण्यात आला. परंतु कामगारंची उपचारासाठी गैर सोय होत होती याबाबत चेंबरने वारंवार पाठपुरावा केलेला होता. सदर पाठ्पुरावा करण्यामध्ये चेंबरचे संचालक रमेश आरवाडे यांचा मोलाचा वाटा आहे. सदरच्या पाठपुराव्यामुळेच लवकरच कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सेवा दवाखाना सुरु होणार आहे. सदर सेवा दवाखन्यामध्ये २ डॉक्टर, ५ स्टाफ राहणार आहे. सदर सेवा दवाखाना चालू झाल्यावर कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व कामगारांना याचा फायदा होणार आहे.

सदर जागेची पाहणी करतेवेळी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, कमिटीचे सदस्य उपसंचालक राजेश सिंग व संजय शर्मा, डॉ. जयश्री जावडेकर, व्यवस्थापक संकेत कळंत्रे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या