मनपाकडून अचानकच स्वागत कमानीवर कर आकारणीचा प्रकार,जयश्रीताई पाटील व संतप्त गणेश भक्तांच्या रोषानंतर कारवाई स्थगित

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 3:52 PM

आज गणपतीचा पाचवा दिवस सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माननीय आयुक्त साहेबांनी आज एक तुगलकी आदेश काढला सांगली शहरातील गणेश उत्सव मंडळासमोरील स्वागत कामानी वरील ज्या जाहिराती घेतलेले असतात त्यावर कर आकारणी करण्यात येणार असून जागेवर सदर कर भरावा अन्यथा अतिक्रमण निर्मूलन पथक सज्ज ठेवून जागेवर कमानी काढण्याचे आदेश देण्यात आले होते.
आज हा सकाळी प्रकार सावकार गणेशोत्सव मंडळासमोर निर्माण झाला त्यावेळी सांगली शहरातील तमाम गणेश भक्तांची व्यापक बैठक पटेल चौक साने गुरुजी उद्यान मध्ये संपन्न झाली सदर बैठकीसाठी काँग्रेसच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील अजित सूर्यवंशी अजिंक्य पाटील सतीश साखळकर अशोक शेठ शितल नागे उदय टिकारे व अन्य मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंतच्या सांगलीच्या इतिहासात गणेशोत्सव मधील स्वागत कमानी वरील जाहिरातीसाठी कधीही कर आकारणी केली जात नव्हती मात्र आज अचानकच हा का पवित्रा महापालिकेने घेतला कळला नाही अचानक ह्या ओढवलेल्या प्रसंगामुळे सर्व गणेशभक्त प्रचंड चिडलेले होते.
सदर बैठकीमध्ये सर्व विषयाची चर्चा झाली श्रीमती जयश्री वहिनी आणि तात्काळ आयुक्त श्री गुप्ता यांना फोन लावला व सर्व परिस्थिती अवगत केली अन्यथा सर्व गणेशभक्त आज संस्थांचा गणपती पटेल चौकात रस्ता रोको करून अडवणार होते व या प्रकरणाचा निषेध व्यक्त करणार होते वहिनींनी तात्काळ आयुक्तांना फोन केला व सदर मोहीम थांबवण्याची स्थगितीची मागणी केली तसेच सांगली शहर पी आय आहे श्री मोरे साहेब यांनी सुद्धा सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंगच्या ठिकाणी भेट घेऊन आम्ही सुद्धा मनपा प्रशासनाला सांगितले आहे आता गणेशोत्सवाच्या काळात असले काही प्रकार करू नका या सर्वांच्या प्रयत्नामुळे व मंडळाच्या दबावामुळे आजची कारवाई थांबवण्यात आली आहे.
मनपाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मनपाचे प्रयत्न ठीक आहेत मात्र अशा गणेश उत्सवाच्या काळात आधीच महापूर व कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळ असतील व्यापार असेल मोडकळीस आलेला आहे अशा आधीच त्रासात असलेले गणेश उत्सव मंडळ त्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न समजून येत नाही.
एका बाजूला मनपात घोटाळ्याच्या वर घोटाळे होत आहेत खास करून विद्युत घोटाळा मध्ये सहा ते सात कोटी रुपयांची लूट झालेली आहे त्याबाबत मनपा कारवाई करत नाही मात्र सर्वसामान्य गणेश भक्तांच्या मंडळावर कारवाई करायला मनपा कशी काय तत्पर असते याबाबत फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी 
दीपक कापले शिवाजी खोत ओंकार देशपांडे गजानन खरात उदय टीकारे शशिकांत नागे मोटरमालकचे कोठारी संभाजी साने गुरुजी उद्यान मध्ये आंदोलनासाठी उपस्थित असणाऱ्या मंडळांची यादी सावकार गणपती कॉलेज कॉर्नर सांगली शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळ सांगली वखार वाघ गणेशोत्सव मंडळ सांगली मोटर मालक गणेशोत्सव मंडळ सांगली लक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळ सांगली एकता गणेशोत्सव मंडळ कॉलेज कॉर्नर सांगली, झाशी चौक गणेशोत्सव मंडळ सांगली पटेल चौक गणेशोत्सव मंडळ सांगली बोर्ड गल्ली गणेशोत्सव मंडळ सांगली सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ सांगली कापड पेठ गणेशोत्सव मंडळ सांगली गणपती पेठ गणेशोत्सव मंडळ सांगली रणझुंजार गणेशोत्सव मंडळ शास्त्री चौक मृत्युंजय गणेशोत्सव मंडळ सांगली मास्टर दिनानाथ गणेशोत्सव मंडळ सांगली फौजदार गल्ली गणेशोत्सव मंडळ सांगली व्यापारी गणेशोत्सव मंडळ वखाराबाग सांगली कापड पेठ गणेशोत्सव मंडळ सांगली सर्वोदय गणेशोत्सव मंडळ वडर कॉलनी संभाजी कॉलनी गणेशोत्सव मंडळ सांगली या व अशा अनेक मंडळी एकत्र येऊन जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी केला व अन्यायकारी आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध विजय प्राप्त केला.

तांबडे श्री जोशी कलशेट्टी साहेब तसेच कापडपेटचे श्री सारडा सराफ कट्ट्याचे नार्वेकर गणपती पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शहा राजू मलिक इंद्रा मोरे प्रकाश मोरे लक्ष्मीनारायणचे काबरा एकता मंडळाचे अंकुश पाटील व त्यांचे कार्यकर्ते विनायक कोळेकर या आणि अशा सांगलीतील असंख्य मंडळांनी या आंदोलनासाठी प्रखरतेने उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे सांगली शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार अशीच एकता या पुढील काळामध्ये अन्यायकारी निर्णयाविरुद्ध आपण ठेवावी एवढीच श्रीचरणी प्रार्थना....

Share

Other News

ताज्या बातम्या