सध्या सांगली जिल्ह्यामध्ये रात्रीच ड्रोन चाले... अशा पद्धतीने सिरीयल चालू आहे असं वाटतं
पंधरा दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील बोरगाव व परिसरात अशा पद्धतीने ड्रोन फिरत होते आता कालपासून मिरज तालुका पूर्व भागात अशा पद्धतीने ड्रोन फिरताना दिसत आहे.
स्थानिक नागरिकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला पोलीस यंत्रणेने सांगितले सदर ड्रोन हे हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सर्वेचे असतील व अन्य कोणत्यातरी शासकीय यंत्रणेचा सर्वे चालू असेल असेच सांगितले.
मात्र मनात एक प्रश्न उपस्थित होतो रात्रीत असा कोणता सर्वे शासकीय यंत्रणा करत असेल...? दिवसा सर्वे व्यवस्थित होताना दिसत नाही आणि रात्री सर्वे करण्याचे कारण काय..?
सर्वच यंत्रणेने हात वर केल्यावर नागरिकांच्या मनात शंका येते परग्रहावरील तबकड्यात जणू आपल्या इथं रात्री फिरत असावेत का असा संशय बळावत चाललेला आहे आणि याला पूर्णपणे शासकीय यंत्रणा कारणीभूत आहे.
कारण मधी दरोडे चे प्रमाण वाढले मग दरोडे टाकताना ड्रोन द्वारे चित्रीकरण करून दरोडे टाकत असावेत असा पण संशय होता नेमकं अजूनही कळाला मार्ग नाही.
याबाबत पीएमओला आम्ही आता तक्रार करून इजराइलच्या मोसाद या सिस्टीमला बोलवून तपास करायला पाहिजे असे वाटायला लागलेले आहे..
जिल्हा प्रशासन असेल जिल्हा पोलीस प्रशासन असेल पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील यांनी याबाबत तात्काळ शोध मोहीम राबवून नागरिकांच्या पसरत असलेले गैरसमज कमी करावेत अशी विनंती आहे
अन्यथा आम्हाला ड्रोन उडवायचे आंदोलन करावे लागेल.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा