दिनांक 8/9/ 2024 रोजी इस्लामपूर येथील बांधकाम विभागा तील शासकीय विश्रामगृहामध्ये दलित समाजातील सर्वच सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची एकत्रित मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
दलित महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. विकास बल्लाळ व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मा.कबीर चव्हाण यांच्या नियोजन मध्ये संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती
सदर मीटिंगमध्ये दलित समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचार याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बहे गावातील सामाजिक कार्यकर्ता रामभाऊ देवकुळे यांना झालेल्या मारहाणीबाबत सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला .
सदर बैठकीत दलितांच्या वर होणा-या अन्याय अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ इस्लामपूर येथील (डी वाय एस पी) *उपविभागीय पोलीस अधिकारी* यांचे कार्यालयावरती दिनांक *13/ 9/ 2024* रोजी वार *शुक्रवार* सकाळी *11* वाजता सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्याचा ठराव करण्यात आला.....
सदर मिटिंग मध्ये प्रामुख्याने दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा.शंकर महापुरे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष मा. नंदकुमार नांगरे ,समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. विजय चांदणे, भाजप अनूसूचित जाती जमाती सेल चे राज्य सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद चंद्र पवार) या गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.गॅब्रिएल तिवडे, फकीरा सेनेचे राज्याध्यक्ष मा. वीरू फाळके ,वंचित बहुजन आघाडीचे राम थोरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाळवा तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे , स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष मा.प्रशांत सदामते,मा.पिराजी थोरवडे, चर्मकार महासंघाचे मा. अतुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले...
स्वागत व प्रास्ताविक दलित महासंघाचे वाळवा तालुका कार्याध्यक्ष मा.बापूराव बडेकर यांनी केले व आभार दलित महासंघ वाळवा तालुका अध्यक्ष संतोष चांदणे यांनी मानले...
यावेळी दलित महासंघ,डी.पी.आय., समतावादी महासंघ, बहुजन समता पार्टी,भाजप अनूसूचित जाती जमाती सेल,आर पी आय, स्वराज्य सेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, फकिरा सेना, चर्मकार महासंघ आदी पक्ष व संघटना चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.