लोकांच्या जाहिरनाम्यावर सार्वत्रिक चर्चा, सजग नागरिकांनी उपस्थीत रहाण्याचे आवाहन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/04/2024 10:42 AM

सांगली, दि १९...
०७ मे २०२४ रोजी सांगली लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सध्या सारे राजकीय पक्ष एकमेकांच्या उखाळया पाकाळया काढण्यात दंग आहेत. काही दिवसांनी हे सारे राजकीय पक्ष एक उपचार म्हणून पक्षाचा जाहिरनामा प्रसिध्द करतील. लोकांना अफलातून आश्वासने देतील. कारण लोक विसरतात आणि भाळतात असा त्यांचा समज असतो आणि दुर्दैवाने ते खरेही असते. लोकांना अफलातून आश्वासने देताना वाटेल ती आश्वासने देतात. उदा. सा-या नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये, ८०% लोकांना फुकट अन्नधान्य, वेगवेगळ्या जातींची न मिळणारी आरक्षणे अशी भन्नाट आश्वासने दिली जातात. मात्र स्थानिक प्रश्नांवर कोणीही तोंड उघडत नाही आणि प्रश्नही सोडवत नाही. निवडणूका झाल्या की उमेदवार गायब होतात आणि ते पुन्हा पाच वर्षांनी येतात. किमान सांगली लोकसभा मतदार संघातील प्रश्न काय आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे देखल्या देवाला दंडवत या नात्याने का होईन सांगली लोकसभा मतदार संघातील प्रश्नावर किमान चर्चा तरी करतील. बनावट का होईना आश्वासने तरी देतील. यासाठी नागरिकांनी आपल्या मनातील विकासाचे प्रश्न राष्ट्रीय प्रश्न याबाबतचे प्रश्न उमेदवारांना लिखित स्वरुपात अथवा व्हॅटस्अप वर किंवा मेसेजवर श्री. सतिश साखळकर यांच्या मो. नं. ९८८१०६६६९९ तसेच श्री. तानाजी रुईकर यांचेकडे त्यांच्या मो. नं. ९३२३७७१११ वर तारीख २३/०४/२०२४ पर्यंत पाठवावेत. सदरहू प्रश्न जेष्ठ पत्रकार हे विचारतील कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून व्यक्तिगत प्रश्न विचारता येणार नाहीत. सदरहू कार्यक्रम या ठिकाणी ता. हरी का खाना खज़ाना, गणपती मंदीरापाठीमागे पेठभाग नदी किनारी, सांगली या ठिकाणी तारीख २५/०४/२०२४ रोजी दुपारी ४ ते ८ या वेळेत होणार आहे. सदरहू कार्यक्रमाला सजग नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन एका पत्रकाव्दारे श्री. सतिश साखळकर, तानाजी रुईकर व वि. द. बर्वे यांनी केले आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या