सिद्धनाथ पतसंस्थेच्या चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात काळे की गोरे

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 12/02/2024 11:25 AM

 


आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)


दहिवडी दि :माण तालुक्यातील अर्थवाहिन्या असलेल्या सिद्धनाथ नागरिक पद्धतीने पंचवार्षिक दोन निवडणुकीत पतसंस्था स्थापनेनंतर पहिल्यांदाच परिवर्तन झाले कै.चंद्रकांत दडस सिद्धनाथ सभासदचे परिवर्तन पॅनल ने तेरा पैकी 13 जागा जिंकत सत्ताधारी सुनील पोळ सहकार बचाव पॅनल चा दारुण पराभव केला. 
   या सिद्धनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी मधून जोरदार मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला जवळपास सर्वच सभासद हे  1900 च्या वर मतांनी जिंकून आले. 
      सिद्धनाथ पतसंस्थेच्या नूतन संचालक  पहिली सभा श्री शंकर पाटील सो. अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दि. १२ रोजी स. ११ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये ही सभा होत असून या सभेमध्ये सन २०२४ते २०२८ मध्ये संस्थेच्या चेअरमन कोण होणार ? कोणाच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ पडणार तर व्हायचेअरमन कोण होणार याकडे सर्व सभासदांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
आजच्या सभेत होणार निर्णय
चौकट :
कै. चंद्रकांत दडस  यांच्या पत्नी श्रीमती नंदाताई चंद्रकांत दडस यांना वाय चेअरमन करून किमान चंद्रकांत दडस यांच्या त्यागाला न्याय देणार का? याची उत्सुकता लोकांमध्ये आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या