गडचिरोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 31/05/2023 10:30 PM



गडचिरोली, दि.31 : समस्या ग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी राज्यात अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत. समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच महिलांकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा परिषद हॉयस्कूल चामोर्शी रोड गडचिरोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेला होते. सदर शिबिरामध्ये 345 महिला उपस्थित होत्या. त्यावेळी जवळपास 200 च्या वर महिलांकडून तात्काळ त्याच ठिकाणी समस्या स्विकारण्यात आल्या. त्यापैकी 15 महिलांच्या समस्यांचे निराकरण तात्काळ करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमांचे उद्घाटन देवरावजी होळी आमदार विधानसभा क्षेत्र गडचिरोली, यांनी केले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्र गणवीर तहसिलदार, गडचिरोली यांनी केले. कार्यक्रम स्थळी विशेष अतिथी म्हणून परिविक्षाधीन भा.प्र.से. राहुल मीणा हे उपस्थित राहून उपस्थित महिलांना त्यांचे करिता असलेल्या शासनाच्या विविध योजने बाबत मार्गदर्शन केले.

 देवरावजी होळी आमदार विधानसभा क्षेत्र गडचिरोली, यांनी महिलांना संबोधित करतांना म्हटले कि महिलांनी त्यांचे करिता असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व कोणत्याही विभागाच्या योजनेबाबत काही समस्या असल्यास त्या बद्दल विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात यावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या स्थळी प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, ज्योती कडू बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) गडचिरोली, प्रतिभाताई चौधरी, धनंजय साळवे सहा. गट विकास अधिकारी, ए. पी. काळे पशुधन विकास अधिकारी, तसेच नेहा पवार तालुका कृषी अधिकारी, हेमलता परसा गट शिक्षणाधिकारी, डॉ. सुनिल मडावी तालुका आरोग्य अधिकारी, पि. पि. पदा कृषी अधिकारी , एन. आर. परांडे बाल विकास प्रकल्प अधिकारी, तसेच इतर विभागातील तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारती शिवणकर मुख्याध्यापिका जि. प. प्राथमिक शाळा दिभना यांनी केले. तर आभार प्रदर्शन यु. एन. राऊत विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी केले. सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील आशा वरघंटे विस्तार अधिकारी सांख्यीकी, ललिता झरकर अंगणवाडी पर्यवेक्षिका, गडचिरोली व किसन म्हस्के यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या