वैधमापन शास्त्र घोटाळा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 29/05/2023 11:22 PM


                 रोजच्या दगदगगीचया जीवनात प्रत्येक माणसाला मशिन गती आली आहे. त्यातच बेरोजगारी. वाढती लोकसंख्या. महागाई भस्मासुर. पैशांची चणचण यामध्ये आज प्रत्येक व्यक्ती आज भाजून निघाला आहे. आपणं आपल्या वाड्या वस्त्या. गाव. तालुका. जिल्हा. राज्य. देश. यामध्ये रोजच्या रोज जीवनावश्यक वस्तू मग ती. भाजीपाला. फळें. फुलं. किराणा माल. बिल्डिंग मटेरियल. लोखंडी सामान. कपडे. खाद्यपदार्थ. मटण. मासे. तेल. पेट्रोल. डिझेल.   गॅस.  अशा विविध वस्तू आपणं खरेदी करण्यासाठी मार्केट मध्ये जातो. 
               वैधमापन शास्त्र ‌ वजन माप. वजन काटा. हे माध्यम  वस्तू खरेदी आणि विक्री करण्यासाठी ग्राह्य धरले जाते. पण हे सर्व वस्तू मोजण्यासाठी वापरले जाणारे वजन माप हे प्रत्येक जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र विभाग येथे रेनहयू पाशिंग करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण कुठेही असे करणारे व्यापारी दिसतं नाहीत. किंवा वजन काटा पाशिंग. केलेलें दिनांक किंवा पुढची दिनांक कुठंही फलकांवर दिसत नाही. तर तशी तरतूद शासनाने वस्तू विक्री करणारे दुकानदार यांना करणं गरजेचं आहे. एक किलो माप खरोखरच माल आठसे ग्रॅम असतो. पॅकिंग किलोच असतं त्यात वस्तू कमी मापची असतें. 
             आज बाजारात फळें भाजीपाला. विकण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरले जातात त्यांचे कुठंही रेकॉर्ड नाही. त्यांचे पाशिंग नाही. आपण किंवा ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातील बाजारांत रोजच्या रोज ग्राहकांची लूट केली जात आहे. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका हे बाजारात विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे यांच्याकडून कराची पावती घेतात मग या सर्व वजन घोटाळ्यावर यांचें लक्ष नाही कां?? 
सकाळच्या दुधापासून ते संध्याकाळच्या भाजीपाल्यापर्यंत सर्व खरेदी करताना वजन, माप आवश्यक ठरते. मात्र अनेक दुकानदार वजन आणि मापामध्ये फसवणूक करतात. मात्र अशी फसवणूक होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
       ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व विक्रेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी पॅकबंद वस्तूवर वैधमापन शास्त्र अधिनियम व नियमांतर्गत आवश्यक कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये अधिकतम किरकोळ विक्री किंमत (सर्व करासहित) लिहिणे बंधनकारक आहे. एमआरपी, वजन, तसेच उत्पादक, पॅकर्स, आयातदार नाव, पत्ता, उत्पादनाचा महिना, वर्ष, ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, पत्ता बंधनकारक आहेत. तसेच, ग्राहकांना वजनात मापात कमी माल दिल्यास किंवा आढळल्यास तक्रार करता येते, या बाबींसाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कोणत्याही नागरिकांची फसवणूक होऊ नये,
       ग्राहकांचे हित आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी  वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना त्यांच्या वजन आणि मापन यंत्राच्या मॉडेलसाठी  (कलम 22 अन्वये ) मान्यता घेणे आवश्यक आहे, उत्पादन परवाना (कलम 23)/ आयातदार नोंदणी (कलम 19), आणि कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा, 2009 अंतर्गत वजन आणि मापन यंत्राचे सत्यापन/मुद्रांक (कलम 24) करणे आवश्यक आहे. याशिवाय वजन आणि मापन उपकरणांवर  पॅकेज पूर्व स्थितीत  नमूद केलेल्या तसेच ई कॉमर्स माध्यमावर जाहीर केलेल्या घोषणांचे  कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज केलेल्या वस्तू), नियम 2011 च्या  तरतुदींनुसार (नियम 6) पालन करणे आवश्यक आहे.
     उत्पादक* आयातदाराने विकलेल्या वजन आणि मापन उपकरणांची नोंद ठेवणे तसेच त्यांचे उत्पादित*आयात केलेले, विकलेले*वितरित केलेले भाग आणि सरकारला भरलेल्या  शुल्काची पडताळणी करणे आवश्यक आहे.
कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यातील या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम 32 ( उत्पादनाच्या मॉडेलला मान्यता मिळाली नसल्यास ), कलम 45 (परवान्याशिवाय वजन आणि मापे  तयार केल्याबद्दल दंड) अंतर्गत हे कृत्य दंडनीय आहे. कलम ३८ (नोंदणी न केल्याबद्दल  वजन किंवा माप आयातदाराला  दंड), कलम 33 (असत्यापित वजन किंवा माप वापरण्यासाठी दंड) आणि आणि कलम 36 (अप्रमाणित  पॅकेजेसची विक्री केल्याबद्दल दंड )  याकरता दंड किंवा  कारावास किंवा दोन्हींची तरतूद आहे.
 ‌‌        निर्माता/ पॅकरचे नाव आणि पत्ता. पॅकेजमध्ये असलेल्या वस्तूंचे व्यापक / सामान्य नाव.
आत असलेल्या वस्तूंचे वजन, माप किंवा नग जे असेल ते याचे निव्वळ प्रमाण.
पॅकींग आणि उत्पादन केलेला महिना आणि वर्ष.
सर्व करांसहीत कमाल विक्री किंमत. (एम.आर.पी.)
याशिवाय इतर अतिरिक्त माहिती. जसे: ई-मेल, पत्ता, हेल्पलाईन, दूरध्वनी क्रमांक ईत्यादी.
ग्राहकांनी जेथे शक्य असेल तेथे खरेदीचे बील / कॅश मेमो देण्याचा आग्रह करावा व्यापार्‍याद्वारे त्याच्या व्यापार, वाणिज्य व उद्योगासाठी वापरले जाणारे वजन, माप व वजन माप करण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे कायद्यांतर्गत वेळोवेळी वैध मापविद्या निरीक्षकाकडून सत्यापित आणि मुद्रांकित करणे आवश्यक आहे.
व्यापार्‍यांनी त्यांच्या व्यापार, वाणिज्य व उद्योगामध्ये स्वत: च्या फायद्यासाठी करण्यात आलेली हातचलाखी टाळण्यासाठी तराजू, हुक किंवा स्टेंडला लोंबकळविणे आवश्यक आहे.
           ग्राहकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी 10 ग्राम, 100 ग्राम, 500 ग्राम, 1 किलो इत्यादी अशा राउंड मेट्रीक यूनिट्समध्ये खरेदी केल्या पाहिजेत जेणेकरून हिशेब सोपा होतो.
ग्राहकांनी पाव किलो किंवा क्वॉर्टर किलो याचा वापर टाळला पाहिजे. 200 ग्राम किंवा 200 मि.ली. अशा सारखी सोपी दशांश प्रमाण पध्दती वापरायला लावली पाहिजे.
ग्राहकांनी किलोग्राम किंवा ग्राममध्ये दूध न घेता लीटर किंवा मिली लीटरमध्ये खरेदी करावे.
ग्राहकांनी तराजूचे संकेत वाचायला शिकले पाहिजे आणि आपल्या खरेदीच्या वजनाचे निरीक्षण केले पाहिजे.
ग्राहकांनी पैशाच्या किंमतीवर न जाता निश्चित प्रमाणात खरेदी करावी.
ग्राहकांनी कोणतीही वस्तू सीर, फूट इत्यादी जुन्या मापन पध्दतीनुसार खरेदी करण्यास नकार दिला पाहिजे. हे बेकायदेशीर आहे आणि व्यापार्यां कडून फसवणूक होण्याची शक्यता असते.
         ग्राहकांनी दूध खरेदी करताना त्यांनी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात योग्य प्रमाणात दूध मिळाले की नाही हे पाहिले पाहिजे. दूधाच्या पिशवीवरील पॅकिंगची तारीख व कमाल विक्री किंमत (एम.आर.पी.) तपासावी.
ग्राहकांनी गोड पदार्थ, मिठाई इत्यादींची खरेदी करताना त्यांना दिल्या जाणार्याक मिठाईचे निव्वळ वजन करून देण्याचा आग्रह करावा. बॉक्सचे वजन मिठाईच्या वजनात समाविष्ट केले जाणार नाही हे बघणे आवश्यक आहे.
पेट्रोल पंपवर योग्य प्रमाणात पेट्रोल पुरवठा होतो की नाही हे खात्यातर्फे वेळोवेळी तपासले जाते. कमी पुरवठा होत असल्याचा संशय आल्यास ग्राहकांनी त्याबाबतची तक्रार वैध मापविद्या अधिकार्यालकडे करावी. पेट्रोल डिझेल खरेदी करतांना आपणांस माप रास्त येते कां हे दिसतं नाही. मिटरचा फक्त आवाज येतो . 
      तयार कपडे खरेदी करताना ग्राहकांनी कपड्याच्या आकाराने खरेदी न करता फक्त मीटर माप पध्दतीनुसार जसे: मीटर आणि सें.मी. ने खरेदी करावी. विविध कपडे निर्माते वेगवेगळ्या मापाचे कपडे तयार करतात, जेथे त्याला* तिला कपडे मिळू शकतात जे कदाचित त्याल*तिला योग्य बसणार नाहीत. शर्ट कॉलरच्या मापानुसार विकले जातात ज्यामध्ये 1 सें.मी.च्या अंतराने फरक असतो. उदा: 35 सें.मी., 36 सें.मी. 37 सें.मी. ईत्यादी. बनियान छातीच्या मापानुसार विकली जातात ज्यामध्ये 5 सें.मी.च्या अंतराने फरक असतो. उदा: 85 सें.मी., 90 सें.मी., 95 सें.मी. इत्यादी.
ग्राहकांनी जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना नेहमी हेक्टर किंवा चौरस मीटरने खरेदी करावी. चालू कायद्या अंतर्गत एकर, यार्ड, फूट आणि इंच यांना मान्यता नाही.
         ग्राहकांनी पॅकेज वस्तू खरेदी करताना पाकिटावर निव्वळ वजन किंवा माप स्पष्ट आणि सुवाच्च अक्षरात सूचित केले की नाही याची खात्री करावी. पॅकेजींगच्या आकारावरून फसवणूक होऊ शकते. चालू कायद्या अंतर्गत सीलबंद पॅकेजवर आत असलेल्या निव्वळ वस्तू चिन्हांकित करणे अनिवार्य आहे.
ग्राहकांनी लेबलवर लिहिलेले प्रमाण वाचून त्याच्या किंमती तपासणी करणं गरजेचं आहे. पॅकिंग मधील मालाचा दर्जा गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. 
        ग्राहकांनी कुकींग गॅस खरेदी करताना (LPG) गॅस सिलिंडरवर गॅसचे निव्वळ वजन आणि सिलिंडरचे निव्वळ वजन लिहिलेले आहे आणि सील शाबूत आहे की नाही हे बघितले पाहिजे. ग्राहकाला गॅसच्या वजनाबद्दल शंका आल्यास त्यांनी आपल्या उपस्थितीत पुन्हा वजन करून देण्याचा आग्रह करावा. आपण गॅस सिलिंडर घेतो पण कधीही त्याचे वजन चेक करत नाही ‌ . 
        ग्राहक जेव्हा पॅकेज वस्तू खरेदी करतात उदा: सिमेंट, तो* ती संशय आल्यास त्याच्या* तिच्या उपस्थितीत पुन्हा वजन करून घेऊ शकतो* शकते.
एखाद्या वस्तूची किंमत केवळ त्याच्या दर्जावरूनच नव्हे तर त्याच्या प्रमाणानुसार देखील पारखली जाते. ग्राहकांनी त्यांना त्यांच्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळत आहे याविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे.
ग्राहकांनी पॅकेज वस्तू खरेदी करताना प्रत्येक वस्तूंवर खालील माहिती छापील स्वरूपात आहे की नाही याची जाणीव ठेवावी.
          परेल, मुंबई या ठिकाणी मुंबईतील तक्रारींची चौकशी होते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरावर वजने-मापे अधिकारी यांचे कार्यालय असते. ग्राहकास स्वतःच्या फसवणुकीच्या संदर्भात तक्रार करायची असल्यास ते खरेदी केलेल्या वस्तूसह संबंधित जिल्हा किंवा विभागीय अधिकार्‍याकडे लेखी तक्रार करू शकतात. त्यांचा पत्ता पुढील पत्त्यावर मिळू शकतो.
नियंत्रक – वजने-मापे यांचे कार्यालय, सी.एस. क्रमांक ४, २६९, डॉ. एस.एस. राव रस्ता, परेल, मुंबई – ४०००१२ येथे आहे. या कार्यालयाचा दूरभाष क्रमांक : ०२२-२४१७१३५२
      भारत सरकारने 1956 च्या कायद्यामध्ये  आवश्यक ते बदल सुचविण्याकरिता व त्यावर विचार करण्यासाठी  “मैत्र कमिटी” नावाने एक समिती स्थापन केली. मैत्र समितीने सखोल अभ्यास करून  आंतरराष्ट्रीय शिफारशींवर कायदा करणे आवश्यक आहे असे ठरविले व त्यामुळेच मानके वजन आणि मापे कायद्याचा परिणाम म्हणून 1976, “वजन आणि मापांचे मानक (पॅकेज केलेल्या वस्तू)  नियम, 1977” आणि वजन आणि मापांचे मानक (सामान्य) नियम, 1987, अस्तित्वात आले. परत संसदेने  अंबलबजावणी करिता  मानके वजने व मापे अंबलबजावणी अधिनियम 1985 अस्तित्वात आणले  व ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता  प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंचे नियमन आणि मानकीकरणामध्ये आणखी विस्तार केला आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या वेगवान प्रगतीच्या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थांमध्ये, वजन आणि मोजमाप मध्ये एक विशाल उत्क्रांती झाली आहे व वजन आणि मापांची व्याप्ती  वाढल्याने  विद्यमान कायद्यांचे पुनर्परीक्षण करण्याची गरज भासू लागली. सध्या अस्तित्वात  असलेला कायदा  मानके व अंमलबजावणी एकत्र करून  कायदा करण्यात आला व त्याला “द लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट, 2009” असे नाव देण्यात आले आहे व तो  1 एप्रिल  2011  रोजी संपूर्ण देशात लागू झाला
*  मापन -- वस्तुमान (वजन )
* पदार्थाचे वस्तुमान  (वजन) मोजण्यासाठी
   ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे.
*  वजन मोजण्याचे तराजू हे एक साधन आहे. 
 *  १००० ग्रॅम ( १ किग्रॅ ), ५०० ग्रॅम,  २०० ग्रॅम,
 *  १०० ग्रॅम,  ५० ग्रॅम ही वजन मापे आहेत.
  या वजनमापांचा वापर वस्तूंचे वजन
   मोजण्यासाठी करतात.
     * १ किलोग्रॅम  =  १००० ग्रॅम
      *२ किलोग्रॅम  =   २००० ग्रॅम
     * ३ किलोग्रॅम  = ३००० ग्रॅम
      *४ किलोग्रॅम  = ४००० ग्रॅम
      *५ किलोग्रॅम  = ५००० ग्रॅम
      *६ किलोग्रॅम  = ६००० ग्रॅम
      *७ किलोग्रॅम  = ७००० ग्रॅम
      *८ किलोग्रॅम  = ८००० ग्रॅम
      *९ किलोग्रॅम  = ९००० ग्रॅम
      *१० किलोग्रॅम  = १०,००० ग्रॅम
     *१४ किलोग्रॅम  = १४००० ग्रॅम
----------------------------------------
    * अर्धा  किलोग्रॅम = ५०० ग्रॅम
    * पाव किलोग्रॅम  = २५० ग्रॅम
    * पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रॅम
    * सव्वा किलोग्रॅम  = १२५० ग्रॅम
    * दिड किलोग्रॅम   = १५०० ग्रॅम
    * पावणे दोन किलोग्रॅम = १७५० ग्रॅम
    * अडीच किलोग्रॅम  = २५०० ग्रॅम
    * साडेतीन  किलोग्रॅम  = ३५०० ग्रॅम
----------------------------------------
  * १०० किलोग्रॅम  = १ क्विंटल
  * २०० किलोग्रॅम  = २ क्विंटल
*३०० किलोग्रॅम  = ३ क्विंटल
   *५० किलोग्रॅम  = अर्धा क्विंटल
  * २५ किलोग्रॅम  = पाव क्विंटल
  * ७५ किलोग्रॅम  = पाऊण क्विंटल
----------------------------------------
 *  १००० किलोग्रॅम  = १ टन
    *   १० क्विंटल    =  १ टन‌ 
        आपणं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे वैधमापन शास्त्र विभाग यांच्याकडे माहिती अधिकार दाखल करून आपल्या गावातील शहरातील किती दुकानदार यांनी आपले वजन काटे पाशिंग करून घेतले आहेत त्यांची माहिती मिळवा. 
         रेशन दुकानदार यांचे रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण करण्याचे वजन काटे इलेक्ट्रॉनिक न वापरता वजन तागडी वापरणे बंधनकारक करा. 
         सर्वांनी सतर्क रहा आणि लुट थांबवा .
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा 
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859

Share

Other News

ताज्या बातम्या