ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

देवळाली कॅन्टोमेंट बोर्डला राष्ट्रवादीचे निवेदन


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 4/1/2023 11:48:59 AM

देवळाली कॅन्टोमेंट बोर्डला राष्ट्रवादीचे निवेदन

देवळाली कॅम्प शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विजयनगर वार्ड क्र.8 येथील शहा गार्डन रेसिडेन्सी या सोसायटीच्या पाणी पुरवठा संदर्भात कॅन्टोमेंटचे मुख्याधिकारी यांना देवळाली कॅम्प शहर कार्याध्यक्ष प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
     यावेळी युवा नेते शाम पवार, ऍड.संदीप कदम तसेच स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव, अशोक रोकडे, राजेंद्र बनकर, विनायक झनकर, दत्तात्रय कदम, शिवाजी विंचू, सरिता मेटकरे, संजय दोंदे आदि उपस्थित होते.शहा गार्डन रेसिडेन्सी या सोसायटीचे पाणी बिल भरले असतांना ही प्रशासनाने पिण्याचे पाणी जवळ जवळ एक आठवडापासून बंद केलेले आहे. याबाबत प्रशासनाने पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे. अशा प्रकारे पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांना वंचीत ठेवण कितपत योग्य आहे.

प्रशांत कारभारी बच्छाव
शहर कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस देवळाली कॅम्प

Share

Other News