देश स्वातंत्र्य चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तर मराठी अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान- गुणवंत मिसलवाड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/01/2023 7:02 AM

नांदेड- आपला भारत देश हा पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगा असे निक्षूण सांगून युवा वर्गाला आझाद हिंद सेनेत सामील करुन घेऊन देश स्वातंत्र्यासाठी सक्रीय चळवळ चालवून क्रांती करुन मोठे योगदान देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २३ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२६ वी जयंती तर हिंदु हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती या संयुक्तीकरित्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम देशवासीयांसाठी, मराठी माणसांसाठी अनेक आंदोलने करुन अनेक विकासात्मक कार्य करुन मराठी माणसांची अस्मिता जपली असून या दोन्ही महान नेत्यांचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन कार्य करणे ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा.श्री. आशिष मेश्राम यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. हनमंतराव ठाकूर यांच्या हस्ते मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी एसटी कल्याण आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. महेश भोये, समाधान जाधव, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, लेखाकार सतीश गुंजकर, चार्जमन शिवाजी मगर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक विठ्ठल इंगळे, सुधाकर घुमे, विश्‍वासू प्रवाशी संघटनेचे कार्यालयीन प्रमुख सरदार हरजिंदरसिंघ संधू, स. हरपालसिंघ, वरिष्ठ लिपीक राजेंद्र निळेकर, नितीन मांजरमकर, पाळी प्रमुख मनोहर माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन मांजरमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आगारातील कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या