ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*ओबीसींवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवावा - आमदार डॉक्टर देवरावजी होळी*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/23/2022 9:48:15 PM

ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी  गडचिरोली येथे भाजपाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

मध्यप्रदेश सरकारला जे जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही असा  उपस्थित केला प्रश्न

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीमध्ये  ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे हीच आमची भूमिका

*ओबीसी मंत्रालय भाजपा सरकारने सुरु केले*

*दिनांक २३ मे २०२२ गडचिरोली*

*मध्य प्रदेश सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीरतेने घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणा संदर्भातील सर्व अटी पूर्ण करीत ओबीसी समाजाचे आरक्षण मिळवले. परंतु महाराष्ट्र राज्यातील नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अटी व शर्तींची पूर्तता न करता केंद्र सरकार वर दोष देत  केवळ   पोकळ  बाता केल्या  परिणामी  राज्यातील ओबीसी बांधवांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाले. त्यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध करावा तेवढा कमी असून जोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार  असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ओबीसी मोर्चा च्या वतीने इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आयोजित एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या प्रसंगी केले*

*या लाक्षणिक उपोषणाला  खासदार अशोकभाऊ नेते,  जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, जेष्ठ नेते बाबूरावजी कोहळे,  भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे , प्रमोदजी  पिपरे,ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी पारधी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा. रमेशजी बारसागडे ,किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते रमेशजी भूरसे, यूवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नीलभाउ वरघंटे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, महिला आघाडीच्या नेत्या रेखाताई डोळस,  ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे, भाजपा गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,  नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.योगिताताई पिपरे , माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, शहर महामंत्री  केशवजी निंबोड, विनोद देवोजवार , भाजपा  जिल्हा पदाधिकारी प्रणयजी खुणे, अनिलजी पोहनकर,  युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर,  तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहने,तालुका संपर्क प्रमुख विलासजी भांडेकर तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे,  बंडूजी झाडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे,विनोदजी गौरकर, जेष्ठ नेते जयरामजी चलाख,  युवा मोर्चाचे राजू शेरकी , नरेंद्र भांडेकर, यांचे सह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते*
 
*राज्य सरकारचे पूर्ण लक्ष केवळ भ्रष्टाचाराकडे असून राज्यात केवळ घोटाळे सुरू असल्याने हे घोटाळेबाज सरकार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. या सरकारला ओबीसी समाजाशी काही देणेघेणे नसून हे त्यांच्या  नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालवल्या गेले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत कोण करित आहेत याचा  शोध घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.*
 *हे सरकार ओबीसी समाजाप्रती अतिशय उदासीन असून २०१९ पासून या सरकारने ओबीसी समाजाचा  साधा एम्पेरिकल  डाटा देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करू शकले नाही.  याउलट मध्य प्रदेश सरकारने ओबीसी समाजाचा एम्पेरिकल डाटा गोळा केला. त्या संदर्भात असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवले त्यांचा आदर्श या सरकारने घेऊन लवकरात लवकर ओबीसी समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने सरकारने काम करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी असून जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.*

Share

Other News