ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

शामरावनगर पाण्याचा निचरा पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात : नगरसेवक अभिजीत भोसले


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/22/2022 10:31:48 AM          शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य पातळीत निचरा पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात -

       शामराव नगर खिलारे मंगल कार्यालय, कालिका मंदिर परिसर भागातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोल्हापूर रस्त्याखालून मागच्या पावसाळ्यात क्रॅास पाईप्स टाकण्यात आलेले होते. मात्र हे पाईप्स तात्पुरती व्यवस्था म्हणून अगदी घाईत काम केल्याने योग्य लेव्हलमध्ये नसल्याने शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत होत्या. तरीही गेल्या पावसाळ्यात या भागातील पाणी निचरा नेहमी पेक्षा अगदी लवकर शक्य झाला होता. परंतु ह्यावेळेस  horizontal drilling पध्दतीने म्हणजे मुख्य हायवे रस्ता न खोदता जेणेकरून कोल्हापूर रोड वरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन अतिरिक्त पाईप रस्त्याखालून योग्य लेव्हलने टाकण्याची माझ्या प्रयत्नातून सुरू केलेली कामगिरी सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात असून लवकरच ही कामगिरी संपून येणाऱ्या पावसाळा कालावधीत शामराव नगर परिसरातील पाणी अधिक गतीने व अधिक प्रमाणात निचरा होण्यास मदत होणार आहे.

Share

Other News