ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होणार राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/21/2022 11:00:34 PMगडचिरोली,(जिमाका) दि.21: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी आगमन व सायंकाळी सार्वजनिक आरोग्य विभागाची शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे ‍अन्न व औषध विभाग (अन्न व औषध)  यांची आढावा बैठक. सायंकाळी राखीव व मुक्काम.
बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या  72 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, राष्ट्रगीत व इतर शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी नागपुरकडे प्रयाण.
****

Share

Other News