ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी संयुक्त बैठक घ्या, मिरज सुधार समितीचे आमदार सुरेश खाडे यांना साकडे...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/25/2021 7:46:20 PM


***जबाबदारीबाबत प्रशासनाचे एकमेकांकडे बोट... 

      मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे उद्घाटन होऊन एक महिना लोटला तरी, अजूनही कामाला सुरूवात झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र विज वितरण कंपनी या विभागाात जबाबदारी निश्चितीवरून कागदी घोडे नाचवत आहेत. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी लक्ष देऊन या तिन्ही विभागाची संयुक्त बैठक घेत तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी मिरज शहर सुधार समितीने केली आहे. शुक्रवारी 29 ऑक्टोबर रोजी याबाबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन आ. खाडे यांनी समितीला दिले. यावेळी प्रा. मोहन व्हनखंडे, नगरसेवक पांडुरंग कोरे उपस्थित होते.
  सोमवारी सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, बाळासाहेब पाटील, संतोष माने, मुस्तफा बुजरूक, सौ. गीतांजली पाटील, जहीर मुजावर, जावेद शरिकमसलत, राजू दयाळ, अक्षय वाघमारे आदी सदस्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सुमारे 10.800 किमी रस्त्यासाठी 24 कोटींची निविदा मंजूर होऊन रस्त्याचे ऑनलाईन उद्घाटनही 25 सप्टेंबर  2021 रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे.  उद्घाटन होऊन एक महिना लोटला तरी, प्रत्यक्ष कामाची सुरूवात झाली नाही. रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि विद्युत खांब स्थलांतरित करणे आदी कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, महापालिका आणि महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी केवळ कागदी घोडे नाचवत एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना मिरजकरांनी नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याबाबत केवळ आश्श्वासन मिळत असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने यात आमदार खाडे यांनी लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र विज वितरण कंपनी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी समितीने केली आहे.

Share

Other News