ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

* मिरजेत गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह २७ लाखाचा मुद्देमाल जप्त : म्हैसाळ- कागवाड रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/24/2021 3:55:50 PM*** गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे २६९ बॉक्स जप्त : ट्रकसह 27 लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..सांगली: मिरजेत गोवा बनावटीच्या विदेशी दारुचा माल पकडण्यात आले आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह २७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. म्हैसाळ कागवाड रस्त्यावर 
राज्य उत्पादन शुल्कने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे २६९ बॉक्स जप्त केले आहेत. याचबरोबर मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह २७ लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हैशाळ ते कागवाड रस्त्यावर संध्याकाळी एका  मालवाहतुक ट्रकमधून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून गोवा राज्यातून आयात केलेल्या फक्त गोवा राज्यातच विक्री करिता निर्मिती केलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री करिता प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करित असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने कागवाड म्हैसाळ रस्त्यावर सापळा रचला, सदरचे वाहनांची झडती घेतली असता या ट्रक मध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे २६९ बॉक्स मिळून आले. त्यानुसार राज्य उतपादन शुल्क विभागाने २६९ मद्याच्या बॉक्ससह वाहन जप्त करण्यात आले तसेच सदर बॉक्स विदेशी मद्यासह एकूण ६०० प्लॅस्टिक कॅन जप्त करण्यात आले. या ट्रकचा वाहन चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला आहे. या कारवाइत एकूण दारू ट्रकसहित २७,९०,७६०/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पसार झालेल्या संशयित ट्रक चालका विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) ८१,८३ व ९० तसेच १०८ अन्वये कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Other News