*मार्डी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोग आणि मनरेगा कामातील गैरव्यवहार बाबत चौकशीची मागणी*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 15/06/2021 4:17 PM


(सातारा/ प्रतिनिधी)
मार्डी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोग आणि मनरेगा कामातील गैरव्यवहार बाबत चौकशीची मागणी  पोळ रोहित दादासो, पोळ चंद्रकांत नाथाजी  यांनी केली होती. पंचायत समिती माण यांनी पाणीपुरवठा विभाग कामे, मनरेगा विभाग कामे याबद्दल अहवाल चुकीचा देऊन गैरव्यवहार दडपला होता आणि बांधकाम विभागाचा तर अहवाल मिळालाच नव्हता. न्याय मिळणेसाठी व चौकशी राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचेमार्फत होण्यसाठी  पोळ रोहित दादासो, पोळ चंद्रकांत नाथाजी यांनी  १ एप्रिल २०२१ रोजी आमरण उपोषण सुरु केले होते, त्यावेळी शासकीय अधिकारी यांनी राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचेमार्फत चौकशी 
करून 20 एप्रिल 2021 पर्यंत अहवाल देण्याचे मान्य केले  होते व गटविकास अधिकारी यांनी १४ व्या वित्त आयोगात अनियामता झाल्याचे ग्रामपंचायत दप्तर तपासात मान्य करून तसा अहवाल  मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद यांना  पुढील कारवाईसाठी पाठवला होता. याला आता जवळजवळ २ महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत, तरी वरिष्ठ अधिकारी यांनी ठरलेल्या मुदतीत तपासकार्य व चौकशी न करता यात दिरंगाई करून आम्हाला आमरण उपोषण माघे घ्याला लावून तोंडघशी पाडले आहे. 
         तरी राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचेमार्फत चौकशीत दिरंगाई होत असलेबाबत आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती माण यांनी १४ वा वित्त आयोग कामात प्रचंड प्रमाणात अनियमता झाल्याचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद यांना पाठवून सुद्धा काही कारवाई झाली नाही,    या प्रकरणात दिरंगाई करून प्रकरण दडपण्याचे चालू आहे असे निदर्शनास येत आहे.   त्यामुळे आता ग्रामपंचायत 14 वा वित्त आयोग तसेच मनरेगा घोटाळा यातील दोषी पदाधिकारी आणि आम्हाला आमरण उपोषण माघे घेण्यासाठी आश्वासन देऊन फसवणूक करणार्या अधिकारी वर्ग यांचेवर कायदेशीर कारवाई करणेत यावी.

        तरी  जिल्हाधिकारी सातारा यांनी योग्य ते आदेश देऊन राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचेमार्फत चौकशी व गटविकास अधिकारी यांचे अहवालावर अनुसरून  येत्या १५ दिवसात दोषी पदाधिकारी, सामील असलेले अधिकारी वर्ग यांचेवर कारवाई करण्याचे सबंधित प्रशासकीय अधिकारी यांना सांगावे व त्याचे अहवाल  सादर करावेत आणि अन्यथा न्याय मिळण्यासाठी पोळ रोहित दादासो, पोळ चंद्रकांत नाथाजी आणि  जे नागरिक सहभागी होतील ते सर्वजण मिळून दिनांक ३० जून २०२१ सकाळी ११ वाजता मार्डी ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या