लोकहित मंचच्या मागणी नुसार १०० फुटी रस्त्याच्या कामाची शहर अभियंता व नगर अभियंता यांच्याकडून पहाणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 2:35 PM

सांगली प्रतिनिधी :--
                       सांगलीतील शंभर फुटी रस्त्याच्या कामासंदर्भात लोकहित मंचच्या वतीने अनेक वेळा आवाज उठवून या रस्त्याच्या निकृष्ट कामासह डिव्हाइडर, झेब्रा क्रॉसिंग याबाबत मागणी केली होती त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आज 22 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता  महानगरपालिकेचे शहर  अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि नगर अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी पाहणी करून योग्य ते निर्णय घेण्याचा ठरवलं.यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी अधिकाऱ्यांना परिस्थिती दाखवून देत माहिती दिली. सदर रोड डीवाईडरच्या मधी झाडे लावणे, झेब्रा क्रॉसिंग च्या पट्ट्या मारणे, शंभर फुटलाची लाईटचे खांब आहेत त्या डांबावरील लाईट लावणे सध्या लाईट बंद आहेत, विजेचे पोल आहेत ते लवकर करणे अशा अनेक सूचना यावेळी करण्यात आले या सूचनेचे पालन करून लवकरात लवकर करून देतो असे शहर अभियंता पृथ्वीराज  चव्हाण,  नगर अभियंता परमेश्वर हलकुंडे करून देतो असे सांगितले  यावेळी प्रभाग समिती क्रमांक दोनचे  शाखा अभियंता ऋतुराज यादव, प्रभाग प्रभाग समिती तीनचे शाखा अभियंता अशोक कुंभार उपस्थित होते.
      याबद्दल लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी राजेश शिरटीकर , जयराज पाटील, सुधीर पळसुले, लहू भडेकर,पंकज मुळे, उदय भडेकर,संदीप सव्वाशे प्रमोद देशिंगेकर,विशाल शिंदे, विनायक गायकवाड आदि उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या