अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय मेळावा नाशिक येथे संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/04/2024 4:58 PM

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय मेळावा नाशिक येथे "राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत" व त्यांचे सहकारी पंकज भावसार, संजय बलकवडे, श्याम डावरे, जावेद शेख, रमेश चेवले आणि सारिका नागरे यांनी आयोजित केला..

राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खटापुरकर स्वतः उपस्थित होते त्यांच्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला,रामनवमीच्या दिवशी अध्यक्ष यांना एक भेट स्वरुपात आदरणीय अमोल भागवत यांनी राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला,
__राज्यस्तरीय मेळाव्यात प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले__ 
यावेळी प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्ष सनाताई शेख, नाशिक संपर्क प्रमुख देवानंद काळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल देसले, प्रदेश नियंत्रक समिती चे हितेश दाभाडे, महिला विभागीय अध्यक्ष सारिकाताई नागरे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी आवर्जून उपस्थित होते, सुरुवातीच्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे सुत्र हाती घेताना आपल्या समितीकडून समाजाला एक सहयोगाचा संदेश देणे गरजेचे आहे, असे सांगितले.
त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सतीश कुलकर्णी, युवा नेते संध्या कुलकर्णी, युवा नेते जयेश आमले, मनसे नेते कौशल बब्बू पाटील, माजी नगरसेविका माधुरी भोळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या देवळाली कॅम्प अध्यक्ष मुळाने मॅडम व सहकारी, गोविंद नगर जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रत्नपारखी सर, निवांत ओल्ड हेज च्या सौ कुकरेजा आणि संघटनेचे इतर अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची सुरुवात करताना राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांनी राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्याचा हेतू व समितीचा पुढील दृष्टिकोन याविषयी सुरुवातीला प्रस्तावना दिली आणि सूत्रसंचालनाच्या दुसऱ्या टप्प्यात सारिका नागरे यांनी अनेक उदाहरणे देऊन समितीची सादर केली, याचवेळी विभागीय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक मंडलिक यांनी सुद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही अटी काही प्रोटोकॉल्स पाळून आपले कार्य सुरळीत केले पाहिजे व सहकार्याची भावना ठेवूनच यापुढे कार्यरत राहिले पाहिजे असे स्पष्ट केले.

Share

Other News

ताज्या बातम्या