ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कूरखेडा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दादालोरा खिडकीची सूरवात


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/10/2021 3:32:28 PM


कूरखेडा- नितीन देवीकार

      कूरखेडा पोलीस स्टेशन मध्ये ग्रामीण जनतेला विविध शाशकीय योजनेचा लाभ घेण्याकरीता सूविधा व्हावी याकरीता पोलीस दादालोरा खिडकीची सूरवात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांचा हस्ते फित कापत करण्यात आली
      जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल अतिरिक्त पोलीस अधिक्षक समीर शेख,मनिष कलवानीया यांचा संकल्पनेतून ग्रामीण जनतेला विविध शाशकीय योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुका तसेच जिल्हा मूख्यालयात घिरट्या घालाव्या लागतात यावेळी त्यांना अधिकचा वेळ व आर्थीक बोजा सहन करावा लागतो याकरीता एकाच ठिकाणी विविध शाशकीय योजनेचा लाभ व शाशकीय प्रमाणपत्रा करीता अर्ज करण्याची सूविधा निर्माण होण्याचा दृष्टीने पोलीस दादालोरा खिडकी ही संकल्पना जिल्हातील ग्रामीण भागात विविध पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येत आहे यानिमीत्य पोलीस व ग्रामीण जनतेत आत्मीयतेचे संबंध सूद्धा वृंदिगत होणार व पोलीस जनतेचे सेवक आहेत भावणा निर्माण होण्यास मदत होणार आहे येथील पोलीस दादालोरा खिडकीची उदघाटन प्रसंगी ठाणेदार सूधाकर देडे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने पोलीस हवालदार उमेश नेवारे मीनाक्षी तोडासे गौरीशंकर भैसारे ललीत जांभूळकर बाबूराव उराडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तालूक्यातील जनतेने पोलीस विभागाचा पूढाकाराने राबविण्यात येणार्या या एक खिड़की योजनेचा लाभ घेत विविध शाशकिय योजनेचे लाभार्थी व्हावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यानी याप्रसंगी केले

Share

Other News