दिनांक :- 06/01/2026
-----------------------------
-------------------------------
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 10/12/2025 रोजी सचिन कल्याणराव गिधे रा. हॉलीडे पार्क शेजारी शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर हा साई सुनिता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता. त्या दरम्यान फिर्यादी श्रध्दा गिधे हिस आरोपी नामे प्रविण वाघमारे याने फोन करुन सचिन लई माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिली. सचिन गिधे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रध्दा सचिन गिधे हिने दिनांक 15/12/2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 454/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे, दिपक अंबादास पोकळे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 10/12/2025 रोजी गौतम कैलास निकाळे वय 25 वर्षे, रा. राहाता, ता. राहाता, हल्ली रा. सौंदडीबाब चौक, कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहिल्यानगर यास आरोपी नामे प्रविण वाघमारे उर्फ पचास व त्याचा साथीदार अशांनी त्याचे राहते घरी जावुन त्यास साकुरी शिव या ठिकाणी जावुन येवु असे म्हणुन त्यास मोटारसायकलवर बसवुन घेवुन गेले व उपासणे बाबा मंदीराच्या पाठीमागे साकुरी, ता. राहाता या ठिकाणी नेवुन त्यास आरोपी नामे प्रविण वाघमारे व त्याचे इतर साथीदारांनी लाथा बुक्क्या व दगडाने मारहाण करुन पाय फ्रॅक्चर केलेला आहे. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 1027/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (2), 118(1), 115(2), 352, 351 (2), 3(5) प्रमाणे दिनांक 12/12/2025 रोजी गुन्हा दाखल आहे.
आरोपी नामे प्रविण वाघमारे याने व त्याचे साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केलेले असुन अपहरित इसमाचा शोध लागलेला नसल्याने श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींचा तसेच अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आदेशीत केलेले आहे. सदर आदेशानुसार श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आरोपीची माहिती काढणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन रवाना करण्यात आले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन सलग 15 दिवस व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपीची माहिती काढण्यात आली. सदर गुन्ह्यातील आरोपी दिपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाणे बदलत असल्याने पथकाने पुणे, नाशिक, खारघर मुंबई, छ. संभाजीनगर, मालेगांव परिसरामध्ये जावुन सदर आरोपी व त्याचे इतर साथीदारांची माहिती काढली. दिनांक 06/01/2025 रोजी दिपक पोकळे हा त्याचे साथीदारासह मेंढवण शिवार, संगमनेर परिसरातील दगडाचे खाणीमध्ये लपुन बसलेला असल्याची पथकास गुप्त बातमीदार व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ मेंढवण ता. संगमनेर या ठिकाणी जावुन तेथील दगडाचे दगडाचे खाणीस चोहोबाजुनी वेढा घालुन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) दिपक अंबादास पोकळे वय - 34 वर्षे, रा. लोहारे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, 2) गणेश गोरखनाथ दरेकर वय 21 वर्षे, रा. पिंपळगांव जलाल, ता. येवला, जि. नाशिक असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांकडे अपहरित इसम नामे सचिन कल्याणराव गिधे याचेबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी नामे दिपक अंबादास पोकळे याने त्याचे साथीदार 2) गणेश गोरखनाथ दरेकर, 3) प्रविण उर्फ पचास वाघमारे,
4) कृष्णा संतोष वाघमारे यांचेसह अपहरित इसम सचिन गिधे याचा अनैंतिक संबधाचे व आर्थीक व्यवहाराचे कारणावरुन
खुन करुन त्याचे प्रेत टायर व डिझेलचे सहाय्याने जाळुन टाकुन प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपींचे कब्जातुन मयताचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली 15,00,000/- रुपये किमतीची विनानंबरची स्कॉर्पीओ गाडी, 72,000/- रुपये किमतीचे 03 मोबाईल फोन असा एकुण 15,72,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे दिपक अंबादास पोकळे वय - 34 वर्षे, रा. लोहारे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याची शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर, कोपरगांव परिसरामध्ये दहशत आहे. त्याचेविरुध्द खालीलप्रमाणे मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे 17 गुन्हे दाखल आहेत.
अ. क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 राहाता 112/2012 भादविक 399,402
2 राहाता 56/2013 भादविक 394
3 शिर्डी 178/2013 भादविक 392,34
4 शिर्डी 184/2013 भादविक 379
5 राहाता 78/2013 भादविक 307,143
6 राहाता 94/2013 भादविक 452,324
7 संगमनेर शहर 105/2013 भादवि क 379
8 लोणी 99/2013 भादविक 394,34
9 शिर्डी 84/2014 भादविक 394
10 राहाता 21/2014 भादविक 302
11 राहाता I 60/2016 भा.दं.वि.क. 324, 323, 34 वगैरे
12 राहाता I 66/2016 भा.दं.वि.क. 307, 323, 504 वगैरे
13 राहाता I 03/2017 भादविक 395
14 राहाता I 132/2017 भा.दं.वि.कलम 397, 392, आर्म ऍ़क्ट कलम 4/25
सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधि. सन 1999 चे कलम 3(1)(ii)3 (4)
15 राहाता I 220/2023 भा. दं. वि. कलम 395, 341, 385, 384
आर्म ऍ़क्ट कलम 3/25
16 संगमनेर तालुका 56/2025 भा. न्या. सं. क. 308 (2), 118 115(2), 351(2), 352
17 संगमनेर तालुका 593/2025 भा. न्या. सं. क. 109, 112(2), 351 (2) 3(5)
आर्म ऍ़क्ट कलम 4/25
ताब्यातील आरोपींना राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 454/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे करीत आहे.
आरोपी नामे दिपक अंबादास पोकळे वय - 34 वर्षे, रा. लोहारे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणास खंडणी मागितलेली असल्यास अगर त्याचेविरुध्द इतर काही तक्रार असल्यास तक्रार कळविण्याबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडुन अवाहन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.