अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई;२७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/01/2026 8:54 PM

नांदेड : नांदेड तहसील प्रशासन व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मंडळ अधिकारी सय्यद मोहसीन, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मनोज जाधव, माधव भिसे, मारुती श्रीराम, महसूल सेवक बालाजी सोनटक्के व शिवा तेलंग यांच्या महसूल पथकाने पिंपळगाव निमजी परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या एक मोठी बोट, एक छोटी बोट व १२ तराफे आढळून आले. संबंधित बोटी नदीच्या मध्यभागी ठेवण्यात आल्या होत्या.

सदर बोटी जप्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, मनोज जाधव व शिवा तेलंग यांनी धाडसाने नदीत पोहत जाऊन बोटी ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोटी व तराफ्यांचा एकूण अंदाजे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जाळून व फोडून नष्ट करण्यात आला.

या कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंकान्त चिंचोलकर यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला.

अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणांमध्ये महसूल प्रशासनाकडून यापुढेही सक्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या