तृतीय पंथीयांचे गुरु फरीदा बकश यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान;छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/01/2026 8:35 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी व विविध सामाजिक उपक्रम राबून वंचित, उपेक्षित, गोरगरीब लोकांना लोकांना नेहमी मदतीचा हात देणाऱ्या तृतीय पंथीयांच्या गुरु फरीदा बकश यांना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 4 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार जाहीर प्रदान करण्यात आला आहे. 
बिलोली तालुक्यातील जिगळा येथील तृतीय पंथीयांचे गुरु फरीदा बकश यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील गोरगरिबांना अन्नदान, आर्थिक मदत, अतिवृष्टीबाधित, बेघर यांना मदत यासह तृतीयपंथीयांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रेरित केलेआहे.  त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या वतीने फरीदा बकश यांना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बदल सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, व विविध पक्षाचा वितीने,
 यांच्या सह अनेकांनी फरीदा बकश यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या