आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. : पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत यंत्रणेच े काम संपत नाही. लोकांना वेळेत न्याय मिळणे, त्यांची कामे सकारात्मक पद्धतीन े मार्गी लागणे ही बाबत आवश्यक आहे. पालकमंत्री आपल्या दारी हा उपक्रम याच दृष्टीन े महत्वाचा आहे. प्रत्येक विभागान े त्यांच्याशी संबंधित अर्जाचा गतीन े निपटारा होईल याबाबत अत्यंत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाच े अधीक्षक अभियंता अभय काटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, पाटणच े प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळ े यांच्यासह विविध विभागांच े अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही स्थितीत यंत्रणांनी नागरिकांची कामे रखडवणे, विलंब करणे, नकारात्मक प्रतिसाद देणे, लोकांना हेलपाट े मारावयाला लावणे या पद्धतीचा प्रतिसाद खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालकमंत्री कार्यालय आपले दारी या उपक्रमांतर्गत 1 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत 4 हजार 819 अर्ज प्राप्त झाले असून 2 हजार 406 अर्जावर कार्यवाही सुरु आहे. 720 अर्जावर कार्यवाही पूर्ण तर अद्याप 1 हजार 499 अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली नाही या अर्जावर तातडीन े सामाजिक भावनेतून निर्णय घ्यावा, असेही निर्देश दिले