* मराठी ही केवळ सवादाची नव्हे तर रोजगाराची भाषा व्हावी * *- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/01/2026 11:28 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि.: मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायीक महत्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे केवळ आपले कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे असे सांगून या साहित्य संमेलनाला 3 कोटी रुपयांचा शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही अशा साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच े सातारा येथे 1 ते 4 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत ज्येष्ठ साहित्यीक रघुवीर चौधरी होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, आमदार महेश शिंदे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक, मंडळाच े कार्यवाहक सुनिताराजे पवार व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर आदी उपस्थित होते.

साताऱ्याच्या भमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची
पायाभरणी झाली. त्या पवित्र भूमीत 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाहीतर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचार स्वातंत्र्याचा उत्सव आहे. हे संमेलन साहित्याचा आण ि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे. या संमेलनाला साताऱ्याच्या कंदीपेढ्याचा गोडवा लाभला आहे. इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे. शंभरावे साहित्य संमेलन देखील जोरदार झाले पाहिजे. त्यालाही शासन काही कमी पडू देणार नाही, ग्वाहीही त्यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या