*अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपीचे शिक्षेविरुद्ध अपील जिल्हा कोर्टाने फेटाळले शिक्षा कायम*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 06/01/2026 9:13 AM

 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

 वडूज दि:*अपराध घडला तारीख , वेळ व ठिकाण* - दि.11/02/2014 रोजी दुपारी 03:45 वाजताचे सुमारास मौजे वडूज ता.- खटाव जि.- सातारा येथे sbi बँकेसमोर
       - वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीचे मालक काशिनाथ शिवराम फडतरे हे SBI बँकेसमोरून रस्ता ओलांडत असताना यातील आरोपी याने त्याचे ताब्यातील घंटागाडी ही रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगइने अविचाराने भरधाव वेगात चालवून काशिनाथ शिवराम फडतरे यास जोराची धडक मारून अपघात करून त्यांना गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला आहे तसेच जखमीस दवाखान्यात घेऊन न जाता व पोलीस स्टेशनला खबर न देता गाडी घेऊन पळून गेला आहे. म्हणून वगैरे मजकुराची खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात पो. हवा.श्री. ए. व्ही .बोराटे 1175 यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. सदर गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वडूज यांनी सदर आरोपी यास दि. 16/12/2017 रोजी शिक्षा सुनावली. आरोपी याने सदर शिक्षेविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय वडूज येथे अपील दाखल केले होते. सदर अपीलामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील आर.डी. खोत यांनी युक्तिवाद केला यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वडूज मा.कोलेसो यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश वडूज यांनी दिलेली शिक्षा आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद विचारात घेत आरोपीने केलेले अपिल फेटाळत शिक्षा कायम करण्याचा आदेश दि.3.1.2026 रोजी पारित केला.
याकरिता डीवायएसपी माननीय रणजीत सावंत तसेच पोलीस निरीक्षक वडूज माननीय घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे बक्कल नंबर 585 यांनी सरकारच्या वतीने न्यायाच्या दृष्टीने प्रयत्न केले

*पोलीस ठाणे* - वडूज पोलीस ठाणे 
 *गुन्हा रजिस्टर नंबर* - 54/2014
 *कलम* - भा.द.वि.कलम 279,337,338
 *आरोपी* - *अनिल विठ्ठल रायबोले* वय - 34 वर्ष रा.वडूज ता. खटाव जि.सातारा
 *फिर्यादी*- *गणेश लक्ष्मण चव्हाण* 
रा. वाकेश्वर ता. खटाव जि.सातारा

Share

Other News

ताज्या बातम्या