ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विमानतळाच्या नामकरणाचा वाद,शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यावर सरकार ठाम, विरोधकांचे आंदोलन


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/10/2021 11:49:04 AM मुंबई: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे.
 या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. 
 आपल्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने ते रायगडमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. 
नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव  सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर केला आहे.  
त्यानुसार राज्यंत्रिमंडळळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो केंद्राला पाठविला जाणार आहे. 
या विमानतळाला लोकनेते
 दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे. 
त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यातून पाठपुरावा सुरू आहे. 
सिडकोच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा स्थानिकांनी केल्यांतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कृती समितीला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. 
त्यावेळी विमानतळास ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला असून दि.बा. पाटील यांच्याबाबतही सरकारला सादर आहे. 
त्यामुळे त्यांच्या नावाबाबतचा अन्य प्रस्ताव द्यावा. 
सरकार त्याचा नक्की विचार करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 
मात्र विमानतळास दि.बा यांचेच नाव द्यावे अन्यथा आंदोलन  छेडले जाईल अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

Share

Other News